Posts

Showing posts from August, 2016

जर्मनीमध्ये घ्या खगोलशास्त्राचे धडे!

मूलभूत संशोधनासाठी जगद्विख्यात असलेल्या जर्मनीमधील मॅक्स प्लँक संस्थेच्या एका सदस्य संशोधन संस्थेतील म्हणजेच मॅक्स प्लँक इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी या संस्थेतील आकाशगंगा आणि विश्वउत्पत्तीशास्त्र विभागाकडून ( The Galaxies and Cosmology Department) खगोलशास्त्र , पदार्थविज्ञान किंवा तत्सम विषयांतील पदव्युत्तर पदवी ग्रहण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून खगोलशास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. दि. १ ऑक्टोबर २०१६ ते जून २०१७ च्या दरम्यान सुरू होणाऱ्या या पीएचडी अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती असून अर्जदारांना यासाठी दि. १२ सप्टेंबर २०१६ पूर्वी अर्ज सादर करायचा आहे. शिष्यवृत्तीविषयी:- जर्मनीमधील मॅक्स प्लँक संस्था जगातल्या मोजक्या नामांकित संस्थांपैकी एक असून मूलभूत संशोधनासाठी जगभर संस्थेचे नाव आदराने घेतले जाते. मॅक्स प्लँक संस्था फक्त जर्मनीतच नव्हे , तर संपूर्ण युरोपमध्ये कार्यरत असून संस्थेचे पहिले बिगरयुरोपीय केंद्र २००७ मध्ये फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठाच्या ज्युपिटर कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रत्येक आयामाला स्प

थायलंडमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती

थायलंडमधील एक प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या चुलाभोर्ण ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट हे रसायनशास्त्र , जीवशास्त्र व पर्यावरण या विद्याशाखांतील अभ्यासक्रमांसाठी ओळखले जाते. संस्थेकडून हुशार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना संबंधित विषयांतील पदव्युत्तर संशोधन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी संस्थेकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून ३० नोव्हेंबर २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल : - चुलाभोर्ण ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट ( CGI) हे थायलंडमधील एक प्रमुख खासगी विद्यापीठ आहे. सीजीआय हे उपयोजित जैविक विज्ञान , जैवरसायनशास्त्र व पर्यावरणशास्त्रांमधील आंतरविद्याशाखीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध असलेले विद्यापीठ आहे. विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रम हे जवळच असलेल्या चुलाभोर्ण संशोधन संस्थेच्या सहकार्याने राबवले जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या शास्त्रज्ञ असलेल्या थायलंडच्या राजघराण्यातील राजकन्या प्रा. डॉ. चुलाभोर्ण महिदोल यांच्या ४८व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या प्रशस्त विद्यापीठाची स्थापना करण्या

कॅनडामध्ये पीएच.डी.साठी शिष्यवृत्ती

कॅनडामधील एक प्रमुख संशोधन केंद्र व महत्त्वाचे विद्यापीठ असलेल्या अल्बर्टा विद्यापीठाकडून वेगवेगळ्या विषयांतील पदव्युत्तर पदवी ग्रहण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून पुढे त्या विषयांत पीएच.डी. करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. जानेवारी २०१७ मध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी सेमिस्टरमधील पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती असून अर्जदारांना यासाठी १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी अर्ज सा दर करायचा आहे. शिष्यवृत्तीविषयी :- कॅनडामधील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा हे जगातल्या पहिल्या नामांकित शंभर तर देशातल्या पहिल्या पाच विद्यापीठांपैकी एक आहे. १९०८ मध्ये स्थापन झालेले हे शासकीय विद्यापीठ पश्चिम प्रांतातील अल्बर्टा राज्याच्या राजधानीत म्हणजे एडमंटन या शहरात क्षेत्रफळाने मोठय़ा भूभागावर वसलेले आहे. एडमंटनमध्ये विद्यापीठाचे चार कॅम्पस आहेत , ज्यामध्ये दीडशे देशांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसह जवळपास चाळीस हजार विद्यार्थी वेगवेगळ्या एकूण चारशे विद्याशाखांमध्ये आपले शिक्षण घेत आहेत. एवढी मोठी विद्यार्थीसंख्या व तीन हजार प्राध्यापक वर्गासह असलेला एकूण पाच हजारांच्या घरात जाणारा विद्यापीठ