Posts

Showing posts from 2014

अमेरिकेतील पदवीधरांसाठी रेडक्रॉस अधिछात्रवृत्ती

Image
अमेरिकेतील रेड क्रॉस या संस्थेतर्फे अमेरिकी विद्यापीठांतून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसहित सध्या अमेरिकेत पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रात वेतनासह व विनावेतन उन्हाळी अधिछात्रवृत्ती (summer internship) दिली जाते. २०१५ साली घेतल्या जाणाऱ्या या उन्हाळी अधिछात्रवृत्ती कार्यक्रमासाठी (दि. ८ जून २०१५ ते १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत ) ‘अमेरिकन रेड क्रॉस’कडून दि.२७ फेब्रुवारी २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिछात्रवृत्तीबद्दल:             भविष्यातील ‘रेड क्रॉस’च्या ध्येयधोरणांना लक्षात घेऊन विविध क्षेत्रांमधील बहुविध पार्श्वभूमी असलेले युवा नेतृत्व जागतिक पातळीवर तयार व्हावे, व वेगवेगळ्या देशांमधील तरुणाईला अल्पवयातच ही संधी सहज उपलब्ध व्हावी या हेतूने अमेरिकन रेड क्रॉस या संस्थेच्या वतीने ही अधिछात्रवृत्ती सुरु करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर रेड क्रॉसचे कार्य वैद्यक क्षेत्राबरोबरच इतर कार्यक्षेत्रांत देखील सुरु आहे. त्यामुळे इतर विविध क्षेत्रांमधील कुशल मनुष्यबळाची वानवा भविष्यात भासू नये हे संस्थेने लक्षात घेतले आहे. म्हणूनच संबंधित अधिछात्र

महिलांना इंग्लंडमध्ये अर्धवेळ एमबीएसाठी शिष्यवृत्ती

इंग्लंडमधील हल विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलकडून ‘लीडरशिप एक्झिक्युटिव्ह एमबीए स्कॉलरशिप’ या नावाने महिलांना अर्धवेळ (पार्ट टाईम) एमबीए करता यावे यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्याच्या हेतूने ही शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली. २०१५ साली दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी हल विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या अर्जदारांकडून दि. १४ सप्टेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: महिलांमध्ये निसर्गत:च उद्योजकतेची प्रेरणा असते. नेमकी हीच गोष्ट हेरून महिलांमधील उद्योजकतेला चालना मिळावी व त्यातून एका व्यापक पातळीवर उद्यमशील नेतृत्व तयार व्हावं या हेतूने इंग्लंडमधील हल विद्यापीठात एमबीएसाठी शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली. महिलांवरील इतर जबाबदारी लक्षात घेता त्यांना अर्धवेळ (पार्ट टाईम) एमबीए करता येणं सहज शक्य आहे . त्यामुळे विद्यापीठाने आपल्या बिझनेस स्कूलमध्ये उमेदवारांना अर्धवेळ एमबीएसाठी  प्रवेश देणं सुरु केलं. प्रवेश मिळाल्यानंतर कोणत्याही अडचणींशिवाय एमबीए पूर्ण करता यावे यासाठी बिझनेस स्कूलकडून ‘लीडरशिप एक्झिक्युटिव्ह एमबीए स्कॉलरशिप’ या नावाने

भारतीय कलाकारांसाठी ब्रिटनमध्ये शिष्यवृत्ती

    भारतीय कलाकारांनी गुणात्मक व व्यावसायिक ध्येये गाठावीत व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे हितसंबंध तयार व्हावेत या हेतूने दोन्ही देशांच्या पुढाकाराने कलाक्षेत्रासाठी उचललेलं एक पाऊल म्हणजे भारतीय कलाकारांसाठी ब्रिटनमध्ये दिली जाणारी ’सीडब्लूआयटी’ शिष्यवृत्ती. चार्ल्स  वॅलेस इंडिया ट्रस्टकडून ( CWIT ) दरवर्षी  दृश्यकला, नृत्य, संगीत, नाट्य, चित्रपट आदी विविध क्षेत्रांतील भारतीय कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कलेचे मूल्यमापन करता यावे यासाठी ब्रिटनमध्ये शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१५-१६ साठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित कला क्षेत्रांमधील अर्जदारांकडून दि. १५  नोव्हेंबर २०१४  पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.   शिष्यवृत्ती बद्दल : सांस्कृतिक व भाषिक विविधता असणाऱ्या भारतासारख्या देशातील बहुविध कलेचे संवर्धन व्हावे या उद्देशाने ब्रिटनस्थित ‘ चार्ल्स  वॅलेस इंडिया ट्रस्ट’कडून ( CWIT ) दरवर्षी कला क्षेत्रांतील भारतीय कलाकारांना ब्रिटनमध्ये शिष्यवृत्ती दिली जाते. भारतातील बहुसंख्य कलाकारांना करिअरच्या पहिल्या काही टप्प्यांमध्येच आपल्या इच्छाकांक्षांना सुरुंग

नेदरलँड्समध्ये उच्चशिक्षणासाठी पाठ्यवृत्ती कार्यक्रम

     डच परराष्ट्र मंत्रालयाकडून विकसनशील देशांसाठी सहयोग विकास निधीच्या माध्यमातून उच्चशिक्षणासाठी ‘नेदरलँड्स पाठ्यवृत्ती कार्यक्रम’ राबवला जातो. या पाठ्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत कोणत्याही डच विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही विषयातील लघु अभ्यासक्रम,पदव्युत्तर आणि पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही पाठ्यवृत्ती दिली जाते. २०१५  साली दिल्या जाणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून दि. ४ नोव्हेंबर २०१४  पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.   पाठ्यवृत्ती बद्दल :  ‘नेदरलँड्स पाठ्यवृत्ती कार्यक्रम’ ही संपूर्ण पाठ्यवृत्ती डच परराष्ट्र मंत्रालयाकडून’कडून दिली जाते. मंत्रालयाने  क्षमता व सहयोग विकास निधीच्या माध्यमातून सुमारे ५१ विकसनशील देशांच्या उच्चशिक्षणातील योगदानासाठी Netherlands Fellowship Programme -NFP  हाती घेतला व दरवर्षी तो यशस्वीपणे राबवला. या पाठ्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत कोणत्याही डच विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही विषयातील लघु अभ्यासक्रम, पदव्युत्तर आणि पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या मंत्रालयाच्य

हार्वर्डमध्ये रॅडक्लिफ पाठ्यवृत्ती कार्यक्रम

जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठातील ‘रॅडक्लिफ इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्सड् स्टडी’ हा विभाग विविध क्षेत्रांतील तज्ञ-विचारवंत, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, कलाकार किंवा लेखक इत्यादी सृजनशील क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना रॅडक्लिफ आंतरराष्ट्रीय पाठ्यवृत्तीद्वारे त्यांच्या या नवनिर्मितीत मोलाचे योगदान देऊ इच्छितो. म्हणूनच हार्वर्ड विद्यापीठाच्या या विभागाकडून उपरोक्त व्यावसायिकांनी त्यांच्या सबंधित विषयांतील प्रगत व अद्ययावत काम करावे यासाठी त्यांना रॅडक्लिफ पाठ्यवृत्ती बहाल केली जाते.  दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ही पाठ्यवृत्ती संबंधित क्षेत्रात भरीव कार्य असणाऱ्या पात्र अर्जदारांना दिली जाणार आहे.  २०१५ साली दिल्या जाणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी विविध क्षेत्रातील व विविध विषयातील अर्जदारांकडून दि. १ ऑक्टोबर २०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठ्यवृत्तीबद्दल: ‘रॅडक्लिफ आंतरराष्ट्रीय पाठ्यवृत्ती’ ही फक्त हार्वर्डच नव्हे तर जगभरात नाव कमवलेली पाठ्यवृत्ती आहे. कारण ही पाठ्यवृत्ती ‘हार्वर्ड’कडून दिली जाते व दुसरे म्हणजे सृजनशील क्षेत्रातलं किंवा एखादं नवनिर्मितीचं काम करण्यासाठी

ऑस्ट्रेलियामधील ‘आंतरराष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती’

तंत्रज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनासाठी ख्यातनाम असणाऱ्या ऑस्ट्रेलियातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’कडून विज्ञान-तंत्रज्ञानातील उच्च शिक्षणानंतर पुढे संबंधित विषयात संशोधन करू इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी ‘आंतरराष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती’ या नावाने ही शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती पी.एच.डी. करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर संशोधनातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास (मास्टर्स बाय रिसर्च) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दिली जाणार आहे. २०१४ साली दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून दि.२० ऑगस्ट२०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल रिसर्च स्कॉलरशिप’ ( यूटीएसआयआरएस )  या नावाने ओळखली जाणारी ही   शिष्यवृत्ती ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, सिडने’कडून दिली जाते. तंत्रज्ञानातील संशोधनासाठी हे विद्यापीठ प्रसिद्ध आहे. विद्यापीठाला ‘असोसिएशन ऑफ ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी नेटवर्क’ आणि असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीज’ या संस्थांकडून अतिशय उत्तम दर्जाचे मानांकन मिळालेले आहे.  विज्ञा