नेदरलँड्समध्ये उच्चशिक्षणासाठी पाठ्यवृत्ती कार्यक्रम

    

डच परराष्ट्र मंत्रालयाकडून विकसनशील देशांसाठी सहयोग विकास निधीच्या माध्यमातून उच्चशिक्षणासाठी ‘नेदरलँड्स पाठ्यवृत्ती कार्यक्रम’ राबवला जातो. या पाठ्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत कोणत्याही डच विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही विषयातील लघु अभ्यासक्रम,पदव्युत्तर आणि पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही पाठ्यवृत्ती दिली जाते. २०१५  साली दिल्या जाणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून दि. ४ नोव्हेंबर २०१४  पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
 पाठ्यवृत्तीबद्दल:
 ‘नेदरलँड्स पाठ्यवृत्ती कार्यक्रम’ ही संपूर्ण पाठ्यवृत्ती डच परराष्ट्र मंत्रालयाकडून’कडून दिली जाते. मंत्रालयाने  क्षमता व सहयोग विकास निधीच्या माध्यमातून सुमारे ५१ विकसनशील देशांच्या उच्चशिक्षणातील योगदानासाठी Netherlands Fellowship Programme -NFP  हाती घेतला व दरवर्षी तो यशस्वीपणे राबवला. या पाठ्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत कोणत्याही डच विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही विषयातील लघु अभ्यासक्रम, पदव्युत्तर आणि पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या मंत्रालयाच्या सूचीतील ५१ विकसनशील देशांच्या विद्यार्थ्यांना ही पाठ्यवृत्ती दिली जाते. भारत या विकसनशील देशांपैकी एक आहे. यावर्षी दिल्या जाणाऱ्या एकूण पाठ्यवृत्तींची संख्या मंत्रालयाने नमूद केलेली नाही मात्र एकूण पाठ्यवृत्तींमध्ये यावेळी महिलांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. प्रत्येक पाठ्यवृत्तीधारकाच्या अभ्यासक्रमाचा कालावधी वेगवेगळा असेल. लघु अभ्यासक्रम हे दोन आठवड्यांपासून ते एक वर्षापर्यंतच्या कालावधीचे असू शकतात. तर पदव्युत्तर अभ्यस्क्रम एक किंवा दोन वर्षांचे असू शकतात. अभ्यासक्रमाच्या कालावधीप्रमाणे पाठ्यवृत्ती दिली जाईल. पीएचडीच्या पाठ्यवृत्तीधारकाला ही पाठ्यवृत्ती चार वर्षांसाठी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दोन वर्षांसाठी उपलब्ध असेल. पाठ्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचा अभ्यासक्रम किंवा  संशोधन पूर्ण करून पदवी घेणे योग्य राहील. या पाठ्यवृत्तीअंतर्गत पाठ्यवृत्तीधारकाला ट्युशन फी, दरमहा निवासी भत्ता, वेतन भत्ता, विमा भत्ता, प्रवास भत्ता व संशोधनासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या सर्व सुविधा देण्यात येतील.
आवश्यक अर्हता :
ज्या विद्यार्थ्यांना नेदरलँड्समधील कोणत्याही विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही विषयातील लघु अभ्यासक्रम, पदव्युत्तर किंवा  पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला आहे तेच विद्यार्थी या पाठ्यवृत्तीला अर्ज करण्यास पात्र आहेत.  ही पाठ्यवृत्ती ठराविक विकसनशील देशांमधील सर्व अर्जदारांसाठी खुली आहे. या पाठ्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार पदव्युत्तर पदवीधर असावा. मात्र, त्याच्या पदवीबरोबरच त्याच्याकडे कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. अर्जदार कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपनीचा किंवा जागतिक संघटनेचा कामगार नसावा. पदवी व पदव्युत्तर स्तरावर अर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जासाहित अर्जदाराला त्याच्या कामाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे लागेल. त्याबरोबरच अर्जदार टोफेल अथवा आयइएलटीएस या इंग्रजीच्या दोन्हीपैकी एका परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 


अर्जप्रक्रिया:
एनएफपीच्या या पाठ्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याला ज्या डच विद्यापीठात प्रवेश मिळालेला आहे तिथेच हा अर्ज करणे अपेक्षित आहे. संबंधित संस्था अर्जदाराला त्याच्या अभ्यासक्रमानुसार अर्जप्रक्रियेबद्दल कळवेल.
निवड प्रक्रिया:-
या पाठ्यवृत्तीसाठी प्रचंड स्पर्धा असते. अतिशय हुशार व ध्येयवादी उमेदवारांना ज्यांना खरोखरच काहीतरी नाविन्यपूर्ण शिकण्याची आवड आहे अशाच अर्जदारांची निवड या पाठ्यवृत्तीसाठी केली जाते. अर्जप्रक्रियेची मुदत संपल्यानंतर आलेल्या अर्जांची छाननी करून साधारणपणे चार महिन्यानंतर योग्य उमेदवार ठरवले जातात व त्यांना त्यांच्या निवडीबद्दल कळवले जाते.

अंतिम मुदत:- 
या पाठ्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ४ नोव्हेंबर २०१४  आहे.
महत्वाचा  दुवा :-







Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?