Posts

Showing posts from August, 2015

अमेरिकेत कला शाखेतील शिष्यवृत्ती

जागतिक स्तरावर कलाशाखा व सामाजिक शास्त्रांमधील गुणात्मक व अद्ययावत संशोधन करणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणजे अमेरिकेमधील गेटी संशोधन संस्था. कलाशाखा व समाजशास्त्रांचे संशोधन करणे आणि लेखन- संशोधनाच्या माध्यमातून विविध सामाजिक घटकांपर्यंत पोहोचणे व त्यातून या विद्याशाखांचे संवर्धन करणे या हेतूने प्रेरित असलेली ही संस्था लॉस एंजेलिसस्थित ‘द गेटी फाउंडेशन’कडून चालवली जाते. या विविध विद्याशाखांमधील गुणवंत व्यक्तींना त्यांच्या संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर मुक्तपणे व कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक औपचारिकतेशिवाय मांडता याव्यात यासाठी दरवर्षी ठराविक आंतरराष्ट्रीय अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संबंधित विषयांतील अर्जदारांकडून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. गेटी फाउंडेशनच्या या शिष्यवृत्तीला अर्ज सदर करण्याची अंतिम मुदत दि. १ ऑक्टोबर २०१५ आहे. शिष्यवृत्तीबद्दल:- अमेरिकेत लॉस एंजेलिसमधील ‘द गेटी फाउंडेशन’ या संस्थेने कला क्षेत्र व सामाजिक शास्त्रांशी संबंधित इतर शाखांमधील उत्कृष्ट दर्जाच्या संशोधनासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. या पुढाकाराचाच एक भाग

मेक्सिकोमध्ये आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती कार्यक्रम

मेक्सिकन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विविध विषयांमधील पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीच्या स्तरावरील शिक्षण मेक्सिकोमधील विद्यापीठांमध्ये घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या   अभ्यासक्रमासाठी आवश्यक सर्व शुल्क, मासिक वेतन व इतर संबंधित सुविधा असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या शिष्यवृत्तीसाठी विविध विद्याशाखांतील अर्जदारांकडून   दि. ३१ ऑगस्ट २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल : मेक्सिकन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने स्थापन झालेली AMEXCID (T he Mexican Agency for International Development Cooperation ) ही आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक, सांस्कृतिक,आर्थिक व वैज्ञानिक क्षेत्रातील परस्पर सहकार्य व त्यातून विकास या हेतूंनी कार्यरत असलेली संस्था म्हणून ओळखली जाते. अलीकडेच म्हणजे सप्टेंबर २०११ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. शैक्षणिक स्तरावर मेक्सिको व इतर देशांमध्ये आदानप्रदान व्हावी व त्यातून सहकार्य वाढीस लागावे यासाठी संस्थेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी विविध विषयांमधील आंतरराष्ट्रीय