Posts

Showing posts from March, 2014

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?

खरंतर परदेशातील उच्चशिक्षण ही खूप अगोदरपासून नियोजनबद्ध करण्याची बाब आहे . आपल्याकडे परदेशात जाणारे सर्वात जास्त विद्यार्थी हे अभियांत्रिकी शाखेचे असतात . त्याखालोखाल वैद्यकीय , फार्मसी , व्यवस्थापन आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्ज करतात . यापैकी बहुतांश विद्यार्थी हे पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (Masters) जाणारे असतात . हे विद्यार्थी भारतात असताना येथील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आता पुढील शिक्षणासाठी परदेशात जायचे असा विचार सुरु करतात. इतर शाखांच्या तुलनेत अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र परदेशातील उच्चशिक्षणाबाबतीत थोडी अधिक जागृती आहे. कदाचित म्हणून बरेचसे विद्यार्थी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असतानाच परदेशातील पुढच्या शिक्षणाची तयारी सुरु करतात. परदेशात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मग तिथेच पीएचडीला अर्ज करायचा असाही बऱ्याचजणांचा विचार असतो . तो योग्यही आहे . त्यातही परदेशातील उच्चशिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांचा ओढा हा अमेरिकेकडे असतो. मात्र, उच्चशिक्षणासाठी अमेरिकेबरोबरच युके आणि युरो