Posts

Showing posts from February, 2015

चीनमध्ये पदव्युत्तर शिष्यवृत्ती कार्यक्रम

आशिया खंडामधील देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत व आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर आशिया खंडातून उत्तम नेतृत्व तयार व्हावे या उद्देशाने चीनमधील झेजियांग विद्यापीठ या अग्रगण्य राष्ट्रीय विद्यापीठाने सार्वजनिक प्रशासन या विषयातील दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (Master in Public Administration: Asia Synergy Program for Future Leaders) आखलेला आहे. आशियातील इतर देशांच्या विद्यार्थ्यांनीही या अभ्यासक्रमात सहभाग दर्शवावा व आपल्या खंडासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील शांततेसाठी हातभार लावावा म्हणून हा पदव्युत्तर अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये रचला गेला असून त्यासाठी दोन वर्षे शिष्यवृत्तीधारकाला प्रवेशासहित संपूर्ण शिष्यवृत्ती व इतर सवलती दिल्या जाणार आहेत. २०१५ मधील या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झेजियांग विद्यापीठाकडून आशियातील चीनव्यतिरिक्त इतर देशांमधील विद्यार्थ्यांकडून दि. १ जूनपूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:          १८९७ मध्ये स्थापन झालेले झेजियांग विद्यापीठ हे चीनमधील एक प्रमुख राष्ट्रीय विद्यापीठ आहे. चीनमधील झेजियांग प्रांतातील हँग्झो या शहरात असलेले हे व

परदेशातील उच्च शिक्षणाच्या प्रवेशपरीक्षा - जीआरई, जीमॅट, टोफेल, सॅट, आयइएलटीएस.

भारतातील विद्यार्थ्यांमध्ये परदेशातील उच्चशिक्षणाबाबत असलेली जागरुकता आता भरपूर वाढू लागलेली आहे. बरेचसे विद्यार्थी अलीकडे पदवीच्या कालावधीतच तत्सम तयारी सुरु करतात. तरीही अनेकदा नेमकी कोणती परीक्षा द्यायची व कुठल्या देशामध्ये पुढील शिक्षणासाठी अर्ज करायचा हे ठरलेले नसते. मग भलताच गोंधळ उडतो. म्हणूनच उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जीआरई, जीमॅट, सॅट, टोफेल किंवा आयइएलटीएस यांसारख्या ज्या परीक्षा द्याव्या लागतात त्याबद्दल थोडेसे. १) GRE (Graduate Records Exam) – जीआरई ही अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये (Graduate Schools) पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी प्रमाणित केली गेलेली परीक्षा आहे. अमेरिकेतील ‘एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिस’ या संस्थेकडून ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेमध्ये (तसेच काही इतर देशांमध्येही) व्यवस्थापनाव्यतिरिक्त सर्व विद्याशाखांमधील प्रत्येक विषयाच्या पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही एकच परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेच्या माध्यमातून परीक्षार्थ्याचे