Posts

Showing posts from December, 2015

कॅनडामध्ये पदार्थविज्ञानात पदव्युत्तर शिष्यवृत्ती

सैद्धांतिक पदार्थविज्ञानात जागतिक दर्जाच्या मोजक्या स्वतंत्र संशोधन संस्थांपैकी एक म्हणजे कॅनडातील ‘पेरिमीटर इन्स्टिट्यूट फॉर थिओरोटिकल फिजिक्स’. कॅनडातीलच वाटर्लु विद्यापीठाच्या सहकार्याने संस्थेकडून सैद्धांतिक पदार्थविज्ञानातील पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवला जातो. या विषयात संशोधन व उच्चशिक्षण करू इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी दोन्ही संस्थांकडून एकत्रितपणे शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे २०१६ साली दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी पदार्थविज्ञान किंवा गणित विषयातील आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून दि. १ फेब्रुवारी २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल : ‘पेरिमीटर इन्स्टिट्यूट फॉर थिओरोटिकल फिजिक्स’ ही कॅनडातील वाटर्लु शहरात असलेली संशोधन संस्था आहे. पदार्थविज्ञानामध्ये गुणात्मक संशोधन करणाऱ्या जगातल्या ज्या काही मोजक्या स्वतंत्र संशोधन संस्था आहेत, त्यापैकी ही एक.  स्वत: अर्ध्यातच महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिलेल्या, ब्लॅकबेरीचे संस्थापक उद्योजक माईक लझारीदीस यांनी १९९९ साली या संस्थेची स्थापना केली. सैद्धांतिक पदार्थविज्ञानात मुळातच जागतिक दर्जाचे संश