Posts

Showing posts from June, 2013

अमेरिकेत फुलब्राईट - नेहरू पाठ्यवृत्ती

युसिफ या संस्थेकडून भारतीय नागरिकत्व असलेल्या प्राध्यापक व संशोधकांना दरवर्षी अमेरिकेतील विविध विद्यापीठ व संशोधन संस्थांमध्ये अध्यापन आणि संशोधन करण्यासाठी पाठ्यवृत्ती बहाल केली जाते. ही पाठ्यवृत्ती म्हणजेच फुलब्राईट - नेहरू पाठ्यवृत्ती. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा ही पाठ्यवृत्ती हुशार व संशोधनाची प्रचंड आवड असणाऱ्या प्राध्यापक – संशोधकांना देण्यात येणार आहे. या पाठ्यवृत्तीसाठी युसिफकडून दि. १५ जुलै २०१३ पूर्वी   अर्ज मागवण्यात आले आहेत. पार्श्वभूमी  :-  भारत व अमेरिकेमधील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रांतील सहकार्य वाढीस लागावे व   अध्यापन - संशोधन क्षेत्रांतील विचारांची आदानप्रदान व्हावी या हेतूने युसिफ  म्हणजेच द युनायटेड स्टेटस् – इंडिया एज्युकेशनल फाउंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. या संस्थेकडून दोन्ही देशांतील अभ्यासकांना विविध विषयांतील अध्यापन – संशोधनासाठी अनेक प्रकारच्या शिष्यवृत्त्या व इतर सहाय्यवृत्त्या देण्यात येतात. आतापर्यंत संस्थेकडून भारत व अमेरिकेतील मिळून एकूण १७००० पेक्षा अधिक ‘ फुलब्राईट फेलोज ’ निवडले गेलेले आहेत. पाठ्यवृत्तीबद्दल:-

अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

परदेशातील मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या ( Persons of Indian origin or PIO) आणि अनिवासी भारतीयांच्या (NRIs) मुलांना भारतामध्ये उच्च शिक्षण घेता यावे यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने एक शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती योजना Scholarship Programme for Diaspora Children (SPDC) या नावाने ओळखली जाते. या शिष्यवृत्ती अंतर्गत या विद्यार्थ्यांना भारतातील कुठल्याही विद्यापीठात किंवा शैक्षणिक अथवा संशोधन   संस्थेमध्ये   कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक-अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी (फक्त वैद्यकीय व संबंधित इतर क्षेत्रे वगळता ) प्रवेश व त्या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीतील सर्व खर्चाची पूर्तता भारत सरकारकडून केली जाते . SPDC   च्या या शिष्यवृत्तीसाठी परराष्ट्र मंत्रालय , भारत सरकार यांच्याकडून सध्या परदेशस्थित असलेल्या मूळ भारतीय वंशाच्या आणि अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांकडून दि. १० जून २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.    पार्श्वभूमी :- डायस्पोरा (Diaspora) या शब्दाचा अर्थ ' जगाच्या निरनिराळ्या भागांत राहणाऱ्या व्यक्ती ज्यांचे पूर्वज एका ठराविक दे