Posts

Showing posts from April, 2016

जर्मनीमध्ये पीएचडीसाठी शिष्यवृत्ती

बॉन विद्यापीठ हे जर्मनीतील एक महत्वाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. बॉन विद्यापीठ हे मुलभूत विज्ञान, कलाशाखेतील विविध विषय, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण, व्यवस्थापन आदी विषयांतील संशोधन व अध्यापन या दोहोंतही अव्वल आहे. या विद्यापीठाच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च या विभागाच्या वतीने वर उल्लेखलेल्या विविध क्षेत्रांमध्ये अद्ययावत संशोधन व्हावे म्हणून पीएचडीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१७ मधील पीएचडीच्या शिष्यवृत्तीसहित प्रवेशासाठी अर्थशास्त्र,पर्यावरणशास्त्र किंवा सामाजिक शास्त्रे या विषयांशी संबंधित पदव्युत्तर पदवी असणाऱ्या अर्जदारांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी अर्जदारांकडून दि. ३१ ऑगस्ट २०१६ पूर्वी अर्ज  मागवण्यात आले आहेत.  शिष्यवृत्तीबद्दल: जवळपास दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे सन १८१८ साली स्थापना झालेले बॉन विद्यापीठ हे जर्मनीतील प्राचीन व प्रमुख शैक्षणिक संस्थांपैकी एक महत्वाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांपैकी अनेकजण नोबेल पारितोषिक विजेते आहेत, तर इतर नावांमध्ये पोप बेनेडिक्ट, कार्ल मार्क्स, फ्रेडरिक नित्श