Posts

Showing posts from March, 2016

सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

आशिया खंडामधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून जागतिक स्तरावर ओळख असलेले ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयुएस)’ हे विद्यापीठ मुलभूत विज्ञान, आंतरविद्याशाखीय संशोधन व उपयोजित संशोधनातदेखील तेवढेच अव्वल आहे. या विद्यापीठाच्या एकात्मिक विज्ञाने व अभियांत्रिकी या विभागाच्या वतीने वर उल्लेखलेल्या विविध क्षेत्रांमध्ये अद्ययावत संशोधन व्हावे म्हणून पीएचडीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. एकात्मिक विज्ञाने व अभियांत्रिकी या  विद्याशाखांशी संबंधित पदव्युत्तर पदवी असणाऱ्या अर्जदारांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी अर्जदारांकडून दि. १५ मे २०१६   पूर्वी अर्ज  मागवण्यात आले आहेत.  शिष्यवृत्तीबद्दल: सिंगापूरमध्ये असलेले ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयुएस)’ हे  विद्यापीठ सिंगापूरमधील  सर्वात मोठे  स्वायत्त व शासकीय विद्यापीठ आहे. १९०५ साली स्थापना झालेले हे विद्यापीठ सिंगापूरमधील जुने विद्यापीठ तर आहेच त्याशिवाय आशिया खंडामधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ आहे. शैक्षणिक क्षेत्रातील प्रथितयश दोन रॅंकिंग सिस्टम्स म्हणजे क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंग्ज

फ्रान्समध्ये आंतरविद्याशाखीय पीएचडीसाठी पाठ्यवृत्ती

फ्रान्स सरकारच्या पुढाकाराने व LERMIT ह्या आंतरविद्याशाखीय संशोधन संस्था आणि युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस, सॅक्ले  यांच्या सहकार्याने मेडिकेशन व थेराप्युटीक्स या शाखांमध्ये जागतिक दर्जाचे संशोधन व्हावे व त्यासाठी तेवढ्याच तोडीचे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी या संस्थाच्या वतीने पीएचडीसाठी पाठ्यवृत्ती देण्यात येते.  मेडिकेशन व थेराप्युटीक्स शाखांबरोबरच जैवविज्ञान, रसायनशास्त्रज व भौतिकशास्त्र या विद्याशाखांमधील अर्जदारांना मेडिकेशन व थेराप्युटीक्समधील आंतरविद्याशाखीय संशोधन करता यावे, हासुद्धा या पाठ्यवृत्तीचा एक हेतू असतो. ऑक्टोबर २०१६ मध्ये सुरु होणाऱ्या पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून दि. १ एप्रिल २०१६   पूर्वी अर्ज  मागवण्यात आले आहेत.  पाठ्यवृत्तीबद्दल: डिसेंबर २००९ मध्ये फ्रान्स सरकारने भविष्यातही देशाचा विकास दर असाच राहावा म्हणून संशोधन व शिक्षणासाठी जवळपास २२ बिलीयन युरो एवढ्या रकमेची तरतूद केली. या कार्यक्रमांतर्गत सरकारने २०११ मध्ये एकूण १०० संशोधन प्रकल्पांची निवड केली व या संपूर्ण कामाला  Laboratories of E