Posts

Showing posts from August, 2013

अमेरिकेत कृषी तंत्रज्ञानातील पाठ्यवृत्ती

हरितक्रांतीचे प्रणेते व जगद्विख्यात कृषिशास्त्रज्ञ नॉर्मन बोर्लोग यांच्या नावाने अमेरिकन सरकारच्या कृषी विभागाकडून आंतरराष्ट्रीय अर्जदारांना कृषी तंत्रज्ञानातील उच्चस्तरीय संशोधन करण्यासाठी दरवर्षी पाठ्यवृत्ती दिली जाते. २०१४ साठी देण्यात येणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २२ सप्टेंबर २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठ्यवृत्तीबद्दल:- नॉर्मन बोर्लोग कृषी तंत्रज्ञान पाठ्यवृत्ती कार्यक्रम हा हरितक्रांतीचे प्रणेते व जगद्विख्यात कृषिशास्त्रज्ञ नॉर्मन बोर्लोग यांच्या सन्मानार्थ २००४ सालापासून अमेरिकी कृषी विभागाने सुरु केला. या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत जवळपास ६४ देशांमधील कृषी अध्यापक, शास्त्रज्ञ व कृषी नियोजनकर्ते असलेल्या विविध पाठ्यवृत्तीधारकांना गौरवले गेले आहे. या पाठ्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत उपरोक्त व्यावसायिकांना अमेरिकेतील संशोधक किंवा शासकीय संस्थेबरोबर संयुक्त प्रशिक्षण व कृषी तंत्रज्ञानामध्ये उच्चस्तरीय संशोधन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पाठ्यवृत्तीचा एकूण कालावधी साधारणतः ६ ते १२ आठवड्यांचा आहे. काही कालावधीनंतर अमेरिकेतील संबंधित संशोधक किंवा शासकी

मलेशियामध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मलेशियामधील युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम मलेशिया कँपस (UNMC)कडून 'डेव्हलपिंग सोल्युशन्स स्कॉलरशिप' नावाने विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षणया विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विकसनशील देशांमधीलआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. यू.एन.एम.सी.कडून देण्यात येणाऱ्या यावर्षीच्या या शिष्यवृत्तीसाठी पात्रअर्जदारांकडून दि. ८ नोव्हेंबर २०१३ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- 'डेव्हलपिंग सोल्युशन्स स्कॉलरशिप' ही शिष्यवृत्ती फक्त विकसनशीलदेशांतील व तिसऱ्या जगातील राष्ट्रे (third world countries) यांमधीलविद्यार्थी अर्जदारांसाठी उपलब्ध आहे. विकसनशील देशांमध्ये अजूनहीअस्तित्वात असलेल्या बऱ्याचशा समस्यांबाबत या विद्यार्थ्यांमध्येजागरूकता निर्माण करून त्यांच्यामध्ये त्या समस्यांवर मात करण्यासाठीआवश्यक असलेली क्षमता निर्माण करणे आणि या माध्यमातून त्या- त्यादेशाला समृद्ध करण्यात थोडातरी हातभार लावणे असा उदात्त हेतू याशिष्यवृत्तीच्या माध्यमातून यू.एन.एम.सी.ने ठेवलेला आहे. विज्ञान, तंत्रज्ञानव शिक्षण या विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठ