मलेशियामध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती



मलेशियामधील युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम मलेशिया कँपस (UNMC)कडून 'डेव्हलपिंग सोल्युशन्स स्कॉलरशिप' नावाने विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षणया विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विकसनशील देशांमधीलआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. यू.एन.एम.सी.कडून देण्यात येणाऱ्या यावर्षीच्या या शिष्यवृत्तीसाठी पात्रअर्जदारांकडून दि. ८ नोव्हेंबर २०१३ पूर्वी अर्ज मागवले आहेत.


शिष्यवृत्तीबद्दल:-


'डेव्हलपिंग सोल्युशन्स स्कॉलरशिप' ही शिष्यवृत्ती फक्त विकसनशीलदेशांतील व तिसऱ्या जगातील राष्ट्रे (third world countries) यांमधीलविद्यार्थी अर्जदारांसाठी उपलब्ध आहे. विकसनशील देशांमध्ये अजूनहीअस्तित्वात असलेल्या बऱ्याचशा समस्यांबाबत या विद्यार्थ्यांमध्येजागरूकता निर्माण करून त्यांच्यामध्ये त्या समस्यांवर मात करण्यासाठीआवश्यक असलेली क्षमता निर्माण करणे आणि या माध्यमातून त्या- त्यादेशाला समृद्ध करण्यात थोडातरी हातभार लावणे असा उदात्त हेतू याशिष्यवृत्तीच्या माध्यमातून यू.एन.एम.सी.ने ठेवलेला आहे. विज्ञान, तंत्रज्ञानव शिक्षण या विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पदव्युत्तरअभ्यासक्रमांसाठी आणि शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या उमेदवारालाशिष्यवृत्तीअंतर्गत मलेशियामधील 'युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम मलेशियाकँपस'मध्ये शिष्यवृत्तीच्या स्वरुपात ट्युशन फीची संपूर्ण रक्कम वनिवासासहित इतर खर्चासाठी अपेक्षित भत्ता मिळणार आहे. विद्यापीठाकडूनदिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्त्यांची एकूण संख्या पंधरा आहे. विद्यापीठाकडूननॉटिंगहॅम मलेशिया कँपसमध्ये दोनदा प्रवेश दिला जातो - सप्टेंबरमध्येएकदा व डिसेंबर महिन्यात दुसऱ्यांदा. सध्या सप्टेंबरमधील प्रवेशासाठी अंतिममुदत जरी संपली असली तरी अजून डिसेंबरमध्ये सुरु होणाऱ्या ' डिसेंबर२०१३- २०१४' या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी दिल्याजाणाऱ्या प्रवेश व शिष्यवृत्तीची मुदत अद्याप बाकी आहे. डिसेंबरमधीलशिष्यवृत्तीसाठी विद्यापीठाला ऑनलाईन अर्ज पाठवायची अंतिम मुदत दि.८नोव्हेंबर २०१३ आहे. यू.एन.एम.सी.चे विद्यार्थी किंवा सध्याचे पदव्युत्तरपदवीधर मात्र या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकत नाहीत.


आवश्यक अर्हता :-


ही शिष्यवृत्ती फक्त विकसनशील देशांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीखुली आहे. संबंधित शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराला यू.एन. एम. सी. मध्ये २०१३- १४ या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेलाअसावा. अर्जदार हा परदेशी म्हणजेच 'ओव्हरसीज' या प्रवर्गात मोडणाराअसावा. त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी आणि इंग्रजीवरत्याचे प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निवडप्रक्रियेसाठी शैक्षणिकपार्श्वभूमीबरोबरच शिक्षणेतर गुणवत्तेलादेखील (extra curricularachievements) प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे अर्जदाराला त्याच्यासी.व्ही.मध्ये त्याचे शिक्षणेतर उपक्रम, नेतृत्वगुण, त्याचा पूर्वीच्या कामाचाअनुभव इत्यादी बाबींचा उल्लेख करावा लागेल.

अर्ज प्रक्रिया:


अर्जदाराने यू.एन.एम.सी.च्या वेबसाईटवरून पी.डी.एफ. स्वरुपात दिलेलाअर्ज डाऊनलोड करून घ्यावा. अर्ज नीट भरून झाल्यावर तो इ-मेलअटॅचमेंटद्वारे DevelopingSolutionMalaysia@nottingham.edu.my याइ-मेलवर पाठवावा. अर्जाच्या पडताळणीनंतर शिष्यवृत्तीसाठी गुणवत्तेच्या निकषांवर विद्यापीठाच्या पॅनेलकडून अर्जदाराची निवड केली जाईल. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून वैयक्तिक संपर्क करून निवडीबद्दल कळवले जाईल.


अंतिम मुदत:-

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ८ नोव्हेंबर २०१३ आहे.



महत्वाचे दुवे:-


http://www.nottingham.edu.my/index.aspx


वरील लेख लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. १२ ऑगस्ट २०१३ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?