Posts

Showing posts from May, 2015

ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

ऑस्ट्रेलियन सरकारकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ‘एन्डेव्हर पदव्युत्तर शिष्यवृत्ती’ दिली जाते. कोणत्याही विषयातील पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व त्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या शिष्यवृत्तीसाठी विविध विद्याशाखांतील पात्र अर्जदारांकडून दि. ३० जून २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: एन्डेव्हर शिष्यवृत्ती ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धात्मक शिष्यवृत्ती आहे. आंतरराष्ट्रीय अर्जदारांना खुली असलेली ही शिष्यवृत्ती संपूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असून, एखाद्या विषयाचा अभ्यास हाती घेऊन त्यामध्ये संशोधन करून स्वत:चा, स्वत:च्या देशाचा व ऑस्ट्रेलियाचा व्यावसायिक विकास साधता येईल अशा अर्जदाराला या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन सरकार सहकार्य करू इच्छित आहे. ‘एन्डेव्हर’सारख्या जागतिक दर्जाच्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन सरकार ऑस्ट्रेलियाचा शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर चेहरा तयार करू पाहत आहे. म्हणूनच ऑस्ट्रेलिया सरकार त्यांच्या देशातील उच्चशिक्षण आणि संशोधन क्षेत