ऑस्ट्रेलियामधील ‘आंतरराष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती’


तंत्रज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनासाठी ख्यातनाम असणाऱ्या ऑस्ट्रेलियातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’कडून विज्ञान-तंत्रज्ञानातील उच्च शिक्षणानंतर पुढे संबंधित विषयात संशोधन करू इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी ‘आंतरराष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती’ या नावाने ही शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती पी.एच.डी. करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर संशोधनातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास (मास्टर्स बाय रिसर्च) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दिली जाणार आहे. २०१४ साली दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून दि.२० ऑगस्ट२०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल:
‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल रिसर्च स्कॉलरशिप’ (यूटीएसआयआरएसया नावाने ओळखली जाणारी ही  शिष्यवृत्ती ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, सिडने’कडून दिली जाते. तंत्रज्ञानातील संशोधनासाठी हे विद्यापीठ प्रसिद्ध आहे. विद्यापीठाला ‘असोसिएशन ऑफ ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी नेटवर्क’ आणि असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीज’ या संस्थांकडून अतिशय उत्तम दर्जाचे मानांकन मिळालेले आहे.  विज्ञान-तंत्रज्ञानातील कोणत्याही विषयामधील पी.एच.डी.साठी किंवा पदव्युत्तर पातळीच्या संशोधन अभ्यासक्रमासाठी (मास्टर्स बाय रिसर्च) या विद्यापीठाकडून ही शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी दिल्या जाणाऱ्या एकूण संशोधन शिष्यवृत्तींची संख्या ६० एवढी आहे. प्रत्येक शिष्यवृत्तीधारकाच्या संशोधन प्रकल्पाचा कालावधी वेगवेगळा असेल. म्हणजे पीएचडीच्या शिष्यवृत्तीधारकाला ही शिष्यवृत्ती तीन वर्षांसाठी आणि पदव्युत्तर संशोधन अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती दोन वर्षांसाठी उपलब्ध असेल. शिष्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करून पदवी घेणे योग्य राहील. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून पदवीच्या कालावधीकरता ट्युशन फी दिली जाईल. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर कुणालाही देता येणार नाही. अर्जदाराने त्याच्या संशोधनाच्या विषयाची उपलब्धता विद्यापीठाच्या वेबसाईटवर तपासावी.  
आवश्यक अर्हता :
ज्या विद्यार्थ्यांना ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, सिडने’ मध्ये पदव्युत्तर संशोधनासाठी प्रवेश मिळालेला आहे फक्त तेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यास पात्र आहेत. यूटीएसआयआरएस ही शिष्यवृत्ती विज्ञान-तंत्रज्ञानातील कोणत्याही विषयामधील पी.एच.डी.साठी किंवा पदव्युत्तर पातळीच्या संशोधन करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार पदव्युत्तर पदवीधर असावा किंवा त्या पदवीच्या अंतिम वर्षाला शिकत असावा. मात्र, त्याच्या पदवीबरोबरच त्याच्याकडे संशोधनाचा उत्तम अनुभव असावा. अर्जदाराला त्याच्या संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे लागेल. पदवी व पदव्युत्तर स्तरावर अर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदार टोफेल अथवा आयइएलटीएस या इंग्रजीच्या दोन्हीपैकी एका परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीच्या अर्जदाराने विद्यापीठाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्तीला अर्ज करू नये.
अर्ज प्रक्रिया:
यूटीएसआयआरएसच्या या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या वेबसाईटवर जमा करावा. अर्जदार संशोधनाच्या विषयाबद्दल किंवा संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी त्याचा अर्ज जमा करण्यापूर्वी विद्यापीठातील संबंधित विषयातील तज्ञ मार्गदर्शकाला इमेलद्वारे संपर्क करू शकतो. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., त्याने केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन अहवाल (Research Proposal), त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ञांची शिफारसपत्रेआतापर्यंतच्यासर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच अर्जदाराने जीआरई, टोफेल किंवा आयइएलटीएस या परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण विद्यापीठास कळवावे.  
अंतिम मुदत:- 
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.२० ऑगस्ट२०१४  आहे.
महत्वाचा  दुवा :-





Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?