अमेरिकेतील पदवीधरांसाठी रेडक्रॉस अधिछात्रवृत्ती




अमेरिकेतील रेड क्रॉस या संस्थेतर्फे अमेरिकी विद्यापीठांतून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसहित सध्या अमेरिकेत पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रात वेतनासह व विनावेतन उन्हाळी अधिछात्रवृत्ती (summer internship) दिली जाते. २०१५ साली घेतल्या जाणाऱ्या या उन्हाळी अधिछात्रवृत्ती कार्यक्रमासाठी (दि. ८ जून २०१५ ते १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत ) ‘अमेरिकन रेड क्रॉस’कडून दि.२७ फेब्रुवारी २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

अधिछात्रवृत्तीबद्दल:


            भविष्यातील ‘रेड क्रॉस’च्या ध्येयधोरणांना लक्षात घेऊन विविध क्षेत्रांमधील बहुविध पार्श्वभूमी असलेले युवा नेतृत्व जागतिक पातळीवर तयार व्हावे, व वेगवेगळ्या देशांमधील तरुणाईला अल्पवयातच ही संधी सहज उपलब्ध व्हावी या हेतूने अमेरिकन रेड क्रॉस या संस्थेच्या वतीने ही अधिछात्रवृत्ती सुरु करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर रेड क्रॉसचे कार्य वैद्यक क्षेत्राबरोबरच इतर कार्यक्षेत्रांत देखील सुरु आहे. त्यामुळे इतर विविध क्षेत्रांमधील कुशल मनुष्यबळाची वानवा भविष्यात भासू नये हे संस्थेने लक्षात घेतले आहे. म्हणूनच संबंधित अधिछात्रवृत्तीसाठी रेड क्रॉसने खालीलप्रमाणे विषय निवडले आहेत.
           ‘ युवक व युवा प्रौढ सेवा , स्वयंसेवक व्यवस्थापन , लोकपाल कार्यालय , जनरल वकील कार्यालय , गरीबी, बेरोजगारी, आरोग्य आणि सुरक्षितता सेवा, विकास, आपत्ती सेवा, वित्त, शासकीय संबंध, मानव संसाधन विकास, मानवतावादी दृष्टिकोनातून सेवा, चक्रीवादळ पुनर्प्राप्ती कार्यक्रम, माहिती तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय सेवा, विपणन, सार्वजनिक आरोग्य व सुरक्षितता सेवा’
            या अधिछात्रवृत्तीचा एकूण कालावधी दहा आठवड्यांचा असेल. हा कालावधी अधिछात्रवृत्तीधारकाला संस्थेच्या वॉशिंग्टन येथील प्रमुख कार्यालयात किंवा अमेरिकेतील रेड क्रॉसच्या इतर कार्यालयात व्यतीत करता येईल. रेड क्रॉसच्या अधिछात्रवृत्तींपैकी काही अधिछात्रवृत्तीधारकांना विद्यावेतन दिले जाईल तर इतर अधिछात्रवृत्तीधारकांना स्वखर्चाने आपली अधिछात्रवृत्ती पूर्ण करावी लागेल.


आवश्यक अर्हता :


ही अधिछात्रवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. ज्या उमेदवारांचे सध्या पदवीचे शिक्षण चालू आहे असे कोणत्याही शाखेचे विद्यार्थी या अधिछात्रवृत्तीला अर्ज करण्यास पात्र आहेत. रेड क्रॉस उन्हाळी अधिछात्रवृत्ती कार्यक्रम दि. ८ जून २०१५ पासून १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत असेल. ज्या काही ठराविक अधिछात्रवृत्तीधारकांना विद्यावेतन मिळणार आहे ते उमेदवाराच्या शैक्षणिक पार्श्वभूमी व अनुभवांवर आधारित असेल. साधारणत: एका तासाला दहा ते वीस डॉलर्स एवढी रक्कम त्याला मिळू शकते. वर उल्लेख केल्यापैकी प्रत्येक क्षेत्रांत जवळजवळ ८५ अधिछात्रवृत्त्या रेड क्रॉसकडून दिल्या जाणार आहेत. छात्रवृत्तींची संख्या भरपूर असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. अधिछात्रवृत्तीसाठी अर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी व इंग्रजी अतिशय उत्तम असावे. त्याला जर कामाचा अनुभव असेल तर अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे.




अर्ज प्रक्रिया:


ज्या विद्यार्थ्यांना या अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी संस्थेला स्वत:च्या माहितीसह इ-मेल पाठवावा. रेड क्रॉसच्या संपर्काबद्दलची विस्तृत माहिती खाली दिलेल्या वेबसाईटवर मिळेल.


निवड प्रक्रिया:


अर्जदारांची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होईल. प्राथमिक निवड, मुलाखती व अंतिम निवड. प्राथमिक निवडीमध्ये उमेदवाराशी दूरध्वनीवर संवाद साधला जाईल. संस्थेकडे भरपूर अर्ज येत असल्याने त्यातून योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी हा चाळणी टप्पा ठेवलेला आहे. निवड झालेल्या उमेदवारांची त्यानंतर मुलाखत घेतली जाईल आणि शेवटी त्यातून निवडलेल्या उमेदवारांची अंतिम निवड अधिछात्रवृत्तीसाठी केली जाईल.


अंतिम मुदत:-
या अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २७ फेब्रुवारी २०१५ आहे.


महत्वाचा दुवा :-


http://www.redcross.org/support/get-involved/internship-program





वरील लेख (अमेरिकेतील पदवीधरांसाठी रेडक्रॉस अधिछात्रवृत्ती) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. २९ डिसेंबर २०१४ रोजी प्रकाशित झाला.
लेखाचे लोकसत्तातील छायाचित्र 

































Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?