जर्मनीत जीवशास्त्रामध्ये पीएचडीसाठी शिष्यवृत्ती





जर्मनीतील ‘मॅक्स प्लॅंक सोसायटीच्या 'द इंटर नशनल मॅक्स प्लॅंक रिसर्च स्कुल' IMPRS) या संशोधन संस्थे'ने तिथल्याच ’कोन्स्तान्त्झ विद्यापीठा’च्या सहकार्याने जीवशास्त्रातीलपीएचडीचे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यंना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. संस्थेने याशिष्यवृत्तीसाठी पात्र पदव्युत्तर अर्जदारांकडून दि. १५ जानेवारी २०१४ पूर्वी अर्ज मागवलेआहेत.

शिष्यवृत्तीबद्दल:-

जर्मनीतील ‘मॅक्स प्लॅंक सोसायटीच्या 'द इंटर नशनल मॅक्स प्लॅंक रिसर्च स्कुल' (IMPRS)फॉर ऑर्गनायझमल बायोलॉजी ही संशोधन संस्था म्हणजे मॅक्स प्लॅंक सोसायटीच्याच ‘मॅक्सप्लॅंक इन्स्टिट्यूट फॉर ओर्निथोलोजी' आणि 'कोन्स्तान्त्झ विद्यापीठाने एकत्र येऊनजीवशास्त्रातील संशोधनासाठी स्थापन केलेला एक छोटासा गट. मानवी उत्क्रांतीपासून तेमेंदूशी संबंधित शाखांप्रमाणे जीवशास्त्रातील इतरही अनेक शाखांमध्ये उत्कृष्ट दर्जाचे संशोधनव्हावे यासाठी ही संस्था २५ पेक्षाही जास्त आंतरराष्ट्रीय संशोधन गटांबरोबर आव्हानात्मक वअतिशय उच्च दर्जाचे संशोधन घडवून आणते. ही शिष्यवृत्ती सप्टेंबर २०१४ मध्ये सुरुहोणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी आहे. शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षाचा आहे. त्यामुळेशिष्यवृत्तीधारकाला त्याचे पीएचडीचे संशोधन तीन वर्षांमध्येच पूर्ण करावे लागेल. तसेच,शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदाराला या संपूर्ण कालावधीसाठी दरमहा ठराविकवेतनभत्ता व निवासीभत्ता दिला जाईल. तसेच संशोधनाच्या एकूण कालावधीमध्ये संस्थेकडूनप्रवासासाठीही भत्ता दिला जाईल

आवश्यक अर्हता :-

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराकडेसंबंधित क्षेत्रातील म्हणजे जीवशास्त्रातील पदव्युत्तर पदवी असावी किंवा चार वर्षाच्यासमकक्ष पदवी व त्यासहित प्रकाशित झालेला एखादा शोधनिबंध असावा. अर्ज करतेवेळीअर्जदाराकडे उपरोक्त पदवी असावीच असे काही नाही. मात्र पीएचडी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीम्हणजेच सप्टेंबर २०१४अगोदर त्याच्याकडे संबंधित पदवी असायला हवी. अर्जदाराचीशैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदाराचे जर्मन भाषेवर प्रभुत्व असले तरउत्तमच अन्यथा त्याला जर्मन भाषेचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. अर्जदाराचे बोली व लेखीइंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच त्याने TOEFL परीक्षा उत्तम गुणांसहउत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

अर्ज प्रक्रिया:

या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असलेली अर्जप्रक्रिया थोडीशी गुंतागुंतीची आहे. ही संपूर्णअर्जप्रक्रिया तीन टप्प्यामधील इलेक्ट्रॉनिक प्रक्रिया असून ती वेबसाईटवर दिलेल्या ऑनलाईनपद्धतीने पूर्ण करायची आहे. इतर कोणत्याही पद्धतीने किंवा इ - मेलद्वारे जर अर्ज पाठवलागेला तर तो बाद ठरवला जाईल. अर्जदाराला ही अर्जप्रक्रिया इंग्रजीमध्ये पूर्ण करायचीआहे. या प्रक्रियेत अर्जामध्येच त्याला त्याचा सी.व्ही. जमा (अपलोड) करायचा आहे.त्यामुळे आतापर्यंतच्या इतर अर्जप्रक्रियांसारखे नंतर स्वतंत्र सी.व्ही. पाठवण्याची गरज नाही.तसेच अर्जदाराला त्याच्या अर्जाबरोबरच इतर सर्व कागदपत्रे म्हणजे त्याच्या संशोधनाचीथोडक्यात मांडणी व त्याबरोबरच भविष्यातील त्याची स्वत:च्या संशोधनाची रूपरेषा सांगणारेएस.ओ.पी., त्याच्या प्रकाशित झालेल्या आतापर्यंतच्या सर्व शोधनिबंधांच्या प्रती आणित्याच्या संशोधन पार्श्वभूमीशी संबंधित असणाऱ्या दोन किंवा तीन तज्ञ प्राध्यापकांची शिफारसपत्रे इत्यादी एकाच पीडीएफच्या स्वरूपात जमा (अपलोड) करायचीआहेत. अर्जप्रक्रिया थोडीशी गुंतागुंतीची असल्याने अर्जदाराने स्वत:ला भरपूर वेळ देऊन तीपूर्ण करावी. मात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवेपर्यंत थांबू नये.अर्ज व्यवस्थितपणे पूर्ण झाला असल्यास लगेच जमा करावा.

निवड प्रक्रिया:-

एकूण आलेल्या अर्जांमधून शैक्षणिक व संशोधन गुणवत्तेवर निवड झालेल्या अर्जदारांनामुलाखत व पुढील निवड प्रक्रियेसाठी मार्चमध्ये बोलावले जाईल. मुलाखतीनंतर लगेचच अंतिमअर्जदारांना निवडण्यात येईल. यशस्वी अर्जदारांचा पीएचडी कार्यक्रम सप्टेंबर २०१४ मध्ये सुरुहोईल.

अंतिम मुदत:-
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १५ जानेवारी २०१४ आहे.

महत्वाचा दुवा:-

http://www.orn.mpg.de

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?