ब्रिटनमध्ये 'उद्योजकता' संशोधन शिष्यवृत्ती
व्यवस्थापनक्षेत्रातील शिक्षणात ब्रिटन आज जगात अग्रेसर आहे, याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही. म्हणूनच भारतातून MBA किंवा व्यवस्थापनातील इतर पदव्या घेण्यासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आज अमेरिकेपेक्षा ब्रिटनमध्ये जास्त आहे. अनुभवी व उत्तम दर्जाचा प्राध्यापकवर्ग, व्यवस्थापनाच्या अनेक क्षेत्रामध्ये चालणारे संशोधन, त्या संशोधनासाठी विद्यापीठातील अनेक रिसर्च सेंटर्सना असलेले औद्योगिक पाठबळ व सर्व प्रकारच्या अद्ययावत सुविधा या गोष्टींमुळे आज ब्रिटनमध्ये केम्ब्रिज, ऑक्सफर्ड, इम्पिरियल, लंडन स्कूल ऑफ बिझनेस यांसारखी जागतिक दर्जाची अनेक विद्यापीठे आहेत. बाथ विद्यापीठ हे देखील याच नामावलीतील. संडे टाइम्सच्या अलीकडील अहवालानुसार बाथ विद्यापीठातील 'स्कूल ऑफ बिझनेस'ला ब्रिटनमधील प्रथम क्रमांकाचे तर तेथील व्यवस्थापन संशोधन केंद्र पाचव्या क्रमांकाचे म्हणून गौरवण्यात आले आहे. याच विद्यापीठाच्या 'स्कूल ऑफ मॅनेजमेंट'कडून ऑक्टोबर २०१३ ला सुरु होणाऱ्या पीएचडीसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
आवश्यक पात्रता :- ही शिष्यवृत्ती आंतरराष्ट्रीय, युरोपियन व ब्रिटनमधील सर्व अर्जदारांना खुली आहे. अर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. त्याबरोबरच अर्जदार टोफेल अथवा IELTS या इंग्रजी भाषेच्या दोन्हीपैकी एका परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. GRE, GMAT इत्यादी परीक्षा या शिष्यवृत्तीसाठी गरजेच्या नाहीत मात्र दिल्या असतील तर उत्तमच.
शिष्यवृत्तीबद्दल:-
बाथ
विद्यापीठाची हि शिष्यवृत्ती व्यवस्थापन-उद्योजकता क्षेत्रातील जागतिक
बुद्धिमत्तेला आकर्षित करत असते. या शिष्यवृत्तीचा कालावधी तीन वर्षांचा
आहे. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्याला दरवर्षी साधारणत: अठरा हजार युरो
एवढी रक्कम दिली जाते. यामध्ये त्याची ट्युशन फी व निवासासाहित इतर सर्व
खर्च अपेक्षित आहे. मात्र शिष्यवृत्तीचे भवितव्य
विद्यार्थ्याच्या अगोदरच्या वर्षाच्या निकालावर अवलंबून असेल.
'उद्योजकते'च्या या पीएचडीमध्येच विद्यार्थ्याला एकूण दोन
पदव्या - 'मास्टर इन रिसर्च' म्हणजेच M.Res. व पीएचडी दिल्या जातील.
अर्ज प्रक्रिया:
अर्ज ऑनलाईन ( https://www.bath.ac.uk/study/pg/applications.pl) करायचा असल्याने अर्जदाराने
अर्ज करताना स्वत:बरोबर खालील गोष्टी तयार ठेवलेल्या असाव्यात.
१) एसओपी (Statement of Purpose) - ज्यामध्ये तो या शिष्यवृत्तीसाठी अर्ज का करत आहे, ही शिष्यवृत्ती त्याला का दिली जावी, उद्योजकतेमध्ये त्याला पीएचडी का करायची आहे इत्यादी बाबींची कारणे त्याला याच क्रमात लिहावी लागतील.
२) स्वत:चे शिक्षण, शिक्षणेतर उपक्रम, कामाचा अनुभव इ. बाबींनी सज्ज सीव्ही.
३) दोन तज्ञांचे ई-मेल आयडीज् व मोबाईल नंबर्स ज्यायोगे विद्यापीठ त्यांच्याकडून शिफारसपत्र घेईल.
१) एसओपी (Statement of Purpose) - ज्यामध्ये तो या शिष्यवृत्तीसाठी अर्ज का करत आहे, ही शिष्यवृत्ती त्याला का दिली जावी, उद्योजकतेमध्ये त्याला पीएचडी का करायची आहे इत्यादी बाबींची कारणे त्याला याच क्रमात लिहावी लागतील.
२) स्वत:चे शिक्षण, शिक्षणेतर उपक्रम, कामाचा अनुभव इ. बाबींनी सज्ज सीव्ही.
३) दोन तज्ञांचे ई-मेल आयडीज् व मोबाईल नंबर्स ज्यायोगे विद्यापीठ त्यांच्याकडून शिफारसपत्र घेईल.
४) शैक्षणिक पदवी/पदव्युत्तर प्रमाणपत्राची ट्रान्सक्रिप्ट्स् किंवा त्याची ई-कॉपी,TOEFL/IELTS चे गुण व जर असतील तर GRE,GMAT चे सुद्धा.
अंतिम मुदत:-
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १ मार्च २०१३ आहे.
महत्वाचे दुवे : https://www.bath.ac.uk/study/pg/applications.pl
E-Mail: pgradmin@management.bath.ac.uk
वरील लेख (http://www.loksatta.com/career-vrutant-news/reserch-scholarship-in-briten-53739/) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. ०४ फेब्रुवारी २०१३ रोजी छापून आला.
Farach chhan blog.... very useful...
ReplyDelete