ऑस्ट्रेलियामध्ये मरीन इंजिनिअरिंगसाठी शिष्यवृत्ती


ऑस्ट्रेलियामधील द सोसायटी फॉर अंडरवॉटर टेक्नॉलॉजी (SUT)’ ही संस्था मरीन सायन्स, ऑफशोअर इंजिनिअरिंग आणि अंडरवॉटर टेक्नॉलॉजीच्या ऑस्ट्रेलियामधील विविध शाखांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना  गेली अनेक वर्षे शिष्यवृत्ती देते.  दरवर्षीप्रमाणे SUT कडून या वर्षीही मरीन सायन्समधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यावर्षीच्या शिष्यवृत्तीसाठी संस्थेकडून दि.१  ऑगस्ट २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल:- 
 ऑस्ट्रेलियामधील द सोसायटी फॉर अंडरवॉटर टेक्नॉलॉजी (SUT)’ ही संस्था मरीन सायन्स, ऑफशोअर इंजिनिअरिंग आणि अंडरवॉटर टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे उत्तमपणे काम करत आहे. संबंधित क्षेत्रांमध्ये काम करत असतानाच शैक्षणिक क्षेत्रासाठी काहीतरी योगदान द्यावे म्हणून संस्थेने एज्युकेशनल सपोर्ट फंड नावाचा एक निधी संस्थेने तयार केला. संबंधित शिष्यवृत्ती या निधीमधूनच दरवर्षी मरीन सायन्समधील विद्यार्थ्यांना देण्यात येते. SUT ची ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. शिष्यवृत्तीचा कालावधी एक वर्षाचा असून  पुढील वर्षाची शिष्यवृत्ती आधीच्या वर्षाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर अवलंबून असेल. या कालावधीसाठी अर्जदाराला पाच हजार डॉलर्स वार्षिक एवढ्या रकमेची शिष्यवृत्ती देण्यात येते. यातील अर्धी रक्कम २०१४ च्या फेब्रुवारीमध्ये तर उर्वरित अर्धी जून २०१४ मध्ये दिली जाईल. याव्यतिरिक्त, अर्जदाराला SUT च्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मोफत प्रवेश दिला जाईल.  

आवश्यक  अर्हता :- 
SUT च्या या शिष्यवृत्तीसाठी अर्जदार सध्या ऑस्ट्रेलियामध्ये त्याचे मरीन सायन्स, ऑफशोअर इंजिनिअरिंग  किंवा अंडरवॉटर टेक्नॉलॉजी यांपैकी एका शाखेनाध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करत असायला हवा. अथवा त्याला तिथे  वर उल्लेखलेल्या पदवी किंवा पदव्युत्तर पदवीच्या पूर्ण वेळ अभ्यासक्रमास प्रवेश तरी मिळालेला असायला हवा. अर्धवेळ अभ्यासक्रमांस प्रवेश घेतलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी पात्र नाहीत.
अर्ज प्रक्रिया: 
संस्थेच्या वेबसाईटवर अर्जप्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती दिलेली आहे. अर्जदाराला अर्जामधील सर्व बाबींशी संबंधित माहिती देणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन भरायचा असून संस्थेच्या वेबसाईटवर त्याच दुवा (link) दिलेला आहे. अर्जदाराने आपल्या संपूर्ण भरलेल्या अर्जाबरोबर आतापर्यंतची सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्, दोन तज्ञांची शिफारसपत्रेव त्याचा सी.व्ही / रेझ्युमे या सर्व गोष्टी ऑनलाईन जमा करावयाच्या आहेत.

निवड प्रक्रिया :-
संस्थेने नमूद केलेल्या निकषांद्वारे सर्व अर्ज छाननी केले जातील. त्यातून निवडल्या गेलेल्या अर्जदारांच्या शिफारस पत्रांना प्राधान्य दिले जाईल. त्याआधारे निवडक अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. या सर्व प्रक्रियेमधून यशस्वी अर्जदार शिष्यवृत्तीसाठी निवडले जातील. साधारणत: ऑक्टोबर च्या शेवटी अर्जदारांना त्यांचा निकाल कळवला जाईल.

अंतिम मुदत:-
अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.१  ऑगस्ट २०१३ आहे.  
महत्वाचा दुवा :-


वरील लेख (मरीन इंजिनीअरिंगसाठी ऑस्ट्रेलियामधील शिष्यवृत्ती) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. जुलै २०१३ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?