वनस्पती विज्ञानात पीएचडीनंतर पाठ्यवृत्ती
वनस्पती विज्ञानात संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी ‘प्लांट फेलोज’ ही नामांकित पाठ्यवृत्ती दिली जाते. वनस्पती विज्ञानात पीएचडी व अतिरिक्त चार वर्षांचा संशोधन अनुभव असलेले अर्जदार या पाठ्यवृत्तीस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. २०१४ साली दिल्या जाणाऱ्या पाठ्यवृत्तीसाठी वनस्पती विज्ञान किंवा संबंधित इतर विषयातील अर्जदारांकडून या पाठ्यवृत्तीसाठी दि. ३१ मार्च २०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठ्यवृत्तीबद्दल: ‘प्लांट फेलोज’ या नावाने ओळखली जाणारी ही पोस्टडॉक्टरल पाठ्यवृत्ती वनस्पती विज्ञानातील कोणत्याही उपविषयामधील संशोधनासाठी दिली जाणारी एक नामांकित पाठ्यवृत्ती आहे. ही पाठ्यवृत्ती ‘सेव्हन्थ फ्रेमवर्क प्रोग्रॅम’ आणि मेरी क्युरी अॅक्शन्स पीपल या संस्थांकडून दिली जाते. या पाठ्यवृत्तीअंतर्गत पाठ्यवृत्तीधारकाला झुरिकस्थित ‘द झुरिक बेसल प्लांट सायन्स सेंटर’ या संस्थेच्या माध्यमातून त्याचे संशोधन करता येईल. या संस्थेशी एकूण तेरा युरोपीय विद्यापीठे व सात आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सलंग्न आहेत. संस्थेंकडून दिल्या जाणाऱ्या एकूण पोस्टडॉक्टरल पाठ्यवृत्तींची संख्या ६९ एवढी आहे. पाठ्यवृत्तीधा...