फ्रान्समध्ये अंतराळ संशोधनातील पदव्युत्तर शिष्यवृत्ती
जगभरातील ज्या निवडक संस्था भावी अंतराळवीर घडवण्याचे कार्य करतात त्यांपकी एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (International Space University). या विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६ मधील विविध अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून ३० नोव्हेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- अंतराळ क्षेत्रातील विकासाच्या साहाय्याने संपूर्ण जगाचे हित साधावे आणि त्यातून मानवजातीचे भविष्य समृद्ध व्हावे या हेतूने आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (International Space University) या संस्थेची स्थापना १९८७ साली पीटर डायमंड्स, टॉड हॉले व रॉबर्ट रिचर्ड्स या तीन अंतराळवीरांनी एकत्र येऊन केली. फ्रान्समधील अल्सेस प्रांताची राजधानी असलेल्या स्ट्रॉसबर्ग शहरात स्थित असे हे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय, आंतरसांस्कृतिक व आंतरविद्याशाखीय अशा तीन तत्त्वांवर चालते. या विद्यापीठामध्ये अंतराळ अभ्यासक्रम...