एमआयटीची पत्रकारिता पाठय़वृत्ती
जगातील सर्वात प्रतिष्ठित पत्रकारिता पाठय़वृत्ती अशी ओळख संपादन केलेली नाइट सायन्स पाठय़वृत्ती जागतिक दर्जाच्या एमआयटी विद्यापीठातर्फे दिली जाते. एमआयटी विद्यापीठ आणि जेम्स नाइट फाउंडेशनतर्फे विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण व वैद्यक आदी विषयांत उत्कृष्ट पत्रकारिता करत असलेले जगभरातील पत्रकार या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करू शकतात. या पाठय़वृत्तीसाठी २०१६-१७ वर्षांकरता संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून २९ फेब्रुवारी २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठय़वृत्तीविषयी : मानवी जीवनाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असलेल्या विज्ञान-तंत्रज्ञान विषयांतील नवनवे संशोधन व तंत्रज्ञान पत्रकारितेद्वारे सर्वसामान्यापर्यंत पोहोचावे अशा हेतूने एमआयटी विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग व जेम्स नाइट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाइट सायन्स पाठय़वृत्ती कार्यक्रम’ १९८३ साली सुरू करण्यात आला. या पाठय़वृत्तीच्या माध्यमातून जगभरातील निवडक पत्रकारांना एमआयटी, हार्वर्ड, केंब्रिज व ग्रेटर बोस्टन यांसारख्या नामांकित संस्थांमधील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळते. नाइट सायन्स पाठय़वृत्ती कार्यक्रम हा एकूण नऊ मह...