स्वित्झर्लंडमध्ये एमबीएसाठी शिष्यवृत्ती
व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांमधील जागतिक स्तरावरील एक अग्रगण्य संस्था म्हणून स्वित्झर्लंडमधील ‘ इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ’ (IMD) चे नाव घ्यावे लागेल. संस्थेच्या व्यवस्थापन विभागाकडून दरवर्षी गुणवंत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे २०१७ या शैक्षणिक वर्षांसाठीही आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमासहित शिष्यवृत्तीसाठी ३० सप्टेंबर २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीविषयी : – व्यवस्थापन क्षेत्रात जगात पहिल्या क्रमांकावर असलेली संस्था म्हणजे स्वित्झर्लंडमधील ‘ इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ’ (IMD). २०१२ पासून ते २०१५ पर्यंत दरवर्षी ‘ फायनान्शियल टाइम्स ’ ने संस्थेच्या व्यवस्थापनातील मुक्त अभ्यासक्रमांना जागतिक दर्जाचे असल्याचे संबोधून पहिला क्रमांक बहाल केला आहे. एवढेच नव्हे तर फोर्ब्स , बिझनेस वीक , वॉल स्ट्रीट जर्नल इत्यादी संस्थांनीदेखील गेल्या काही वर्षांत आयएमडीला जगातल्या प्रथम क्रमांकाचे...