कॅनडामध्ये करा पीएच.डी.
कॅनडा सरकारकडून व्हेनियर कॅनडा पदवी शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत पीएच.डी. अभ्यासक्रमाचे संशोधन पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. कॅनडातील कोणत्याही विद्यापीठामध्ये आपले उच्चशिक्षण पूर्ण करणाऱ्या अर्जदाराला तीन वर्षांसाठी ती मिळू शकते. मूलभूत विज्ञान, कला शाखेतील विविध विषय, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण, मानववंशशास्त्र, अभियांत्रिकी व वैद्यकीय आदी विषयांतील संशोधन करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. २०१७ मधील पीएच.डी.च्या शिष्यवृत्तीसाठी वर उल्लेखिलेल्या विषयांमध्ये किंवा विषयांशी संबंधित पदव्युत्तर पदवी असणाऱ्या अर्जदारांकडून दि. २ नोव्हेंबर २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. आवश्यक अर्हता: ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराला कॅनडामधील कोणत्याही एका विद्यापीठामध्ये पीएच.डी.साठी प्रवेश मिळालेला असावा. अर्जदाराकडे तो ज्या विषयात पीएच.डी. करणार असेल त्या विषयातील किंवा त्या विषयाशी संबंधित पदव्युत्तर पदवी असावी. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील संशो...