विज्ञान व तंत्रज्ञानातील स्वर्णजयंती पाठ्यवृत्ती
विज्ञान व तंत्रज्ञानातील मुलभूत संशोधन सध्या ज्ञान निर्मितीसाठी आणि एकूणच सर्वसमावेशक विकासासाठी किती आवश्यक आहे याची आता सर्व जगाला हळूहळू कल्पना येऊ लागली आहे , आणि म्हणूनच भारतासारखा महासत्तेचं स्वप्न बघणारा देश म्हणूनच या मूलभूत संशोधनावर व्यापक प्रमाणात लक्ष केंद्रित करत आहे. संशोधना चे पुढील काळातील हे महत्व लक्षात आल्या मुळे अशा संशोधनाला चालना देण्यासाठी भारत सरकार व विज्ञान-तंत्रज्ञान विभागा ने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. अशा अनेक उपक्रमांपैकी एक म्हणजे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संशोधन कर णाऱ्या युवा शास्त्रज्ञांना दिली जाणारी स्वर्णजयंती पाठ्यवृत्ती. २०१२ -१३ च्या या पाठ्यवृत्तीसाठी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून दि. १५ मे २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठ्यवृत्तीबद्दल :- १९९७ साली भारताला स्वतंत्र होऊन ५० वर्षे पूर्ण झाली.स्वातंत्र्याची ही सुवर्ण जयंती साजरी करण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने (Department of Science and Technology) त...