महिलांसाठी स्पेनमध्ये अभियांत्रिकीमधील शिष्यवृत्ती
तर्कशास्त्रातील संशोधनाविषयी भारतात जास्त अनुकूलता नाही. याउलट, मात्र पाश्चात्य देशांमध्ये तर्कशास्त्रामधील संशोधन उत्तम पातळीवर सुरु आहे. युरोपमध्ये या संशोधनात अग्रेसर असलेली एक उत्कृष्ट संस्था म्हणजे स्पेनस्थित - द जरगोझा लॉजिस्टिक्स सेंटर. द जरगोझा लॉजिस्टिक्स सेंटरकडून दरवर्षी एमआयटी – जरगोझामध्ये प्रवेश घेतलेल्या काही निवडक महिला विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. अभियांत्रिकीमधील ही शिष्यवृत्ती ‘मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इन लॉजिस्टिक्स अॅण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दिली जाते. सेंटरच्या या शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी संबंधित विभागाकडून दि. १५ मे २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- स्पेनमध्ये असलेल्या द जरगोझा लॉजिस्टिक्स सेंटरकडून दरवर्षी एमआयटी – जरगोझामध्ये प्रवेश घेतलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवृत्त्या दिल्या जातात. या साऱ्यातून महिलांनी प्रेरणा घेऊन त्यांच्या माध्यमातून लॉजिस्टिक्समधील उत्तमोत्तम तज्ञ तयार व्हावेत अशा हेत...