महिलांसाठी स्पेनमध्ये अभियांत्रिकीमधील शिष्यवृत्ती



तर्कशास्त्रातील संशोधनाविषयी भारतात जास्त अनुकूलता नाही. याउलट, मात्र पाश्चात्य देशांमध्ये तर्कशास्त्रामधील संशोधन उत्तम पातळीवर सुरु आहे. युरोपमध्ये या संशोधनात अग्रेसर असलेली एक उत्कृष्ट संस्था म्हणजे स्पेनस्थित - द जरगोझा लॉजिस्टिक्स सेंटर.  द जरगोझा लॉजिस्टिक्स सेंटरकडून दरवर्षी एमआयटी – जरगोझामध्ये प्रवेश घेतलेल्या काही निवडक महिला विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. अभियांत्रिकीमधील ही शिष्यवृत्ती ‘मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इन लॉजिस्टिक्स अॅण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी  दिली जाते. सेंटरच्या या शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी संबंधित विभागाकडून  दि. १५ मे २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.   

शिष्यवृत्तीबद्दल:- 
स्पेनमध्ये असलेल्या द जरगोझा लॉजिस्टिक्स सेंटरकडून दरवर्षी एमआयटी – जरगोझामध्ये प्रवेश घेतलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवृत्त्या दिल्या जातात. या साऱ्यातून महिलांनी प्रेरणा घेऊन त्यांच्या माध्यमातून लॉजिस्टिक्समधील उत्तमोत्तम तज्ञ तयार व्हावेत अशा हेतूने या शिष्यवृत्त्या महिला विद्यार्थ्यांना प्रदान केल्या जातात.  ही शिष्यवृत्ती मात्र अभियांत्रिकीमधील असून ती ‘मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इन लॉजिस्टिक्स अॅण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी  दिली जाते. शिष्यवृत्तीची रक्कम अर्जदाराच्या एकूण ट्युशन फीच्या अर्धी म्हणजे साधारणपणे २१५०० युरो एवढी आहे.  

आवश्यक  अर्हता :- 
लॉजिस्टिक्स सेंटरची ही शिष्यवृत्ती फक्त महिलांसाठी असून ती सर्व आंतरराष्ट्रीय महिला विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार पदवीधर असावी. मात्र पदवी कार्यक्रमाचा एकूण कालावधी हा चार वर्षांचा असावा. उदाहरणार्थ, आपल्याकडे असेलली फार्मसी किंवा अभियांत्रिकीची चार वर्षांची पदवी. तसेच, या शिष्यवृत्तीला अर्ज करण्याअगोदर अर्जदाराला एमआयटी – जरगोझामध्ये पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला असणे आवश्यक आहे. हा पदव्युत्तर अभ्यासक्रम ‘लॉजिस्टिक्स अॅण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या शाखेमधलाच असावा. अर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. तिचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदाराने  GMAT या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवणे आवश्यक आहे. टोफेल अथवा IELTS  या इंग्रजी भाषेच्या दोन्हीपैकी एका परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


अर्ज प्रक्रिया: 
अर्जदार या शिष्यवृत्तीसाठी दोन प्रकारे म्हणजे एकतर इ-मेल च्या स्वरुपात किंवा पोस्टाने अर्ज करू शकते . अर्जाचा दुवा संस्थेच्या वेबसाईटवर दिलेला आहे. अर्जामध्ये अर्जदाराला एक एस.ओ.पी.(Statement of Purpose)- ज्यामध्ये तिच्या आवडीनिवडी, छंद, शिक्षण, शिक्षणेतर उपक्रम, कामाचा अनुभव,आर्थिक परिस्थिती व शिष्यवृत्तीची गरज का आहे  इत्यादी गोष्टी सविस्तर मांडाव्या लागतील. त्याचबरोबर अर्जदाराला स्वताच्या उत्पन्नाचा दाखला, पासपोर्टची एक प्रत व एमआयटी – जरगोझामध्ये प्रवेश मिळालेला आहे असे नमूद करणाऱ्या प्रवेशपत्राची एक प्रत अर्जाबरोबर जोडावी लागेल किंवा इ मेल करावी लागेल.


अंतिम मुदत:-
अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १५ मे २०१३ आहे.  

महत्वाचा दुवा :-
http://www.mastersupplychain.edu.es


वरील लेख (महिलांसाठी स्पेनमध्ये अभियांत्रिकीमधील शिष्यवृत्ती) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि.१३ मे २०१३ रोजी प्रकाशित झाला.




Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?