ऑस्ट्रेलियामधील ‘आंतरराष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती’
तंत्रज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनासाठी ख्यातनाम असणाऱ्या ऑस्ट्रेलियातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’कडून विज्ञान-तंत्रज्ञानातील उच्च शिक्षणानंतर पुढे संबंधित विषयात संशोधन करू इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी ‘आंतरराष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती’ या नावाने ही शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती पी.एच.डी. करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर संशोधनातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास (मास्टर्स बाय रिसर्च) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दिली जाणार आहे. २०१४ साली दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून दि.२० ऑगस्ट२०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल रिसर्च स्कॉलरशिप’ ( यूटीएसआयआरएस ) या नावाने ओळखली जाणारी ही शिष्यवृत्ती ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, सिडने’कडून दिली जाते. तंत्रज्ञानातील संशोधनासाठी हे विद्यापीठ प्रसिद्ध आहे. विद्यापीठाला ‘असोसिएशन ऑफ ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी नेटवर्क’ आणि असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीज’ या संस्थांकडून अतिशय उत्तम दर्जाचे मानांकन मिळालेले आहे...