हार्वर्डमध्ये रॅडक्लिफ पाठ्यवृत्ती कार्यक्रम
जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठातील ‘रॅडक्लिफ इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्सड् स्टडी’ हा विभाग विविध क्षेत्रांतील तज्ञ-विचारवंत, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, कलाकार किंवा लेखक इत्यादी सृजनशील क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना रॅडक्लिफ आंतरराष्ट्रीय पाठ्यवृत्तीद्वारे त्यांच्या या नवनिर्मितीत मोलाचे योगदान देऊ इच्छितो. म्हणूनच हार्वर्ड विद्यापीठाच्या या विभागाकडून उपरोक्त व्यावसायिकांनी त्यांच्या सबंधित विषयांतील प्रगत व अद्ययावत काम करावे यासाठी त्यांना रॅडक्लिफ पाठ्यवृत्ती बहाल केली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ही पाठ्यवृत्ती संबंधित क्षेत्रात भरीव कार्य असणाऱ्या पात्र अर्जदारांना दिली जाणार आहे. २०१५ साली दिल्या जाणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी विविध क्षेत्रातील व विविध विषयातील अर्जदारांकडून दि. १ ऑक्टोबर २०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठ्यवृत्तीबद्दल: ‘रॅडक्लिफ आंतरराष्ट्रीय पाठ्यवृत्ती’ ही फक्त हार्वर्डच नव्हे तर जगभरात नाव कमवलेली पाठ्यवृत्ती आहे. कारण ही पाठ्यवृत्ती ‘हार्वर्ड’कडून दिली जाते व दुसरे म्हणजे सृजनशील क्षेत्रातलं किंवा एखादं नवनिर्मितीचं काम कर...