चीनमध्ये पदव्युत्तर शिष्यवृत्ती कार्यक्रम
आशिया खंडामधील देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत व आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर आशिया खंडातून उत्तम नेतृत्व तयार व्हावे या उद्देशाने चीनमधील झेजियांग विद्यापीठ या अग्रगण्य राष्ट्रीय विद्यापीठाने सार्वजनिक प्रशासन या विषयातील दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (Master in Public Administration: Asia Synergy Program for Future Leaders) आखलेला आहे. आशियातील इतर देशांच्या विद्यार्थ्यांनीही या अभ्यासक्रमात सहभाग दर्शवावा व आपल्या खंडासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील शांततेसाठी हातभार लावावा म्हणून हा पदव्युत्तर अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये रचला गेला असून त्यासाठी दोन वर्षे शिष्यवृत्तीधारकाला प्रवेशासहित संपूर्ण शिष्यवृत्ती व इतर सवलती दिल्या जाणार आहेत. २०१५ मधील या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झेजियांग विद्यापीठाकडून आशियातील चीनव्यतिरिक्त इतर देशांमधील विद्यार्थ्यांकडून दि. १ जूनपूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: १८९७ मध्ये स्थापन झालेले झेजियांग विद्यापीठ हे चीनमधील एक प्रमुख राष्ट्रीय विद्यापीठ आहे. चीनमधील झेजियांग प्रांतातील हँग...