परदेश शिक्षणाच्या प्रवेशपरीक्षा.
उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जीआरई , जीमॅट , सॅट , टोफेल किंवा आयइएलटीएस यांसारख्या ज्या परीक्षा द्याव्या लागतात त्याबद्दल थोडेसे. जीआरई (Graduate Records Exam) – जीआरई ही अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये ( Graduate Schools) पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी प्रमाणित केली गेलेली परीक्षा आहे. अमेरिकेतील ‘ एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिस ’ या संस्थेकडून ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेमध्ये (तसेच काही इतर देशांमध्येही) व्यवस्थापनाव्यतिरिक्त सर्व विद्याशाखांमधील प्रत्येक विषयाच्या पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही एकच परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेच्या माध्यमातून परीक्षार्थ्याचे विश्लेषणात्मक कौशल्य , इंग्रजीवरील प्रभुत्व व संख्यात्मक क्षमता जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. ही परीक्षा संगणकाच्या सहाय्याने देता येते. मात्र , ज्या ठिकाणी संगणक उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी ती लिखित स्वरूपातदेखील देता येते. या परीक्षेत तीन प्रमुख विभाग आहेत. ...