रशियामध्ये पदार्थविज्ञानातील पोस्टडॉक्टरल शिष्यवृत्ती
युरल फेडरल विद्यापीठ हे रशियातील एक महत्वाचे विद्यापीठ असून, युरल प्रांतातील प्रमुख संशोधन केंद्र आहे. विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय पीएचडीधारक अर्जदारांना पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रम व संशोधन पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६ साठी ही शिष्यवृत्ती पदार्थविज्ञान या विषयासाठी दिली जाणार आहे. युरल विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी’ विभागाच्या क्वांटम मॅग्नेटोमेट्री प्रयोगशाळेकडून या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पीएचडीधारक अर्जदारांकडून दि. १ जून २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: रशियातील प्रमुख दहा विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ व संशोधनासाठी उत्तम मानांकन प्राप्त अशी ओळख असलेले युरल फेडरल विद्यापीठ हे युरल प्रांतातील एक प्रमुख संशोधन केंद्र आहे. युरल फेडरल विद्यापीठाची स्थापना १९२० साली झाली. हे विद्यापीठ हे युरल प्रांतातील सर्वात जुने विद्यापीठ आहे. विद्यापीठात विविध विभांगाकडून पदवी, पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल अभ्यासक्रम राबवण्यात येतात. रशियन अकादमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या सहकार्याने विद्यापीठाने विद्यार्थ्यां...