जर्मनीमध्ये कर्करोग संशोधनासाठी पाठ्यवृत्ती
जगातल्या बव्हंशी लोकसंख्येवर होणारा कर्करोगाचा वाढता प्रभाव पाहता, एक गोष्ट त्वरित ध्यानात येते की कर्करोगाशी संबंधित होणारे मुलभूत संशोधन तुलनेने खूपच अपुरे आहे. हे संशोधन फक्त संख्यात्मकच नव्हे तर दर्जात्मक दृष्टीनेही वाढावे आणि त्यातून कर्करोगाच्या अचूक उपचाराच्या अभिनव पद्धतींचा विकास व्हावा यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था मुळातच खूप कमी आहेत. जर्मनीतील ‘जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटर’ हे त्यापैकी एक प्रतिष्ठित संशोधन केंद्र आहे. कर्करोगावरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय बुद्धिमत्ता आकर्षित करता यावी व त्यातून या युवा संशोधकांना एक उत्तम व्यासपीठ मिळावे या हेतूने नुकतीच पीएचडी पूर्ण केलेल्या अर्जदारांसाठी पोस्टडॉक्टरल पाठ्यवृत्ती कार्यक्रम संस्थेकडून राबवला जातो. यावर्षीच्या या पाठ्यवृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३१ ऑगस्ट २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठ्यवृत्तीबद्दल: जर्मनीमधील हेडलबर्ग शहरात असलेले ‘जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटर (DKFZ)’ हे जर्मनीचे राष्ट्रीय कर्करोग संशोधन केंद्र आहे. दरवर्षी जर्मनीमध्ये साडेचार लाखांपेक्षाही जास्त लोकांना कर्करोग झाल्याचे निदान होते. प्रत्येक ...