जर्मनीमध्ये घ्या खगोलशास्त्राचे धडे!
मूलभूत संशोधनासाठी जगद्विख्यात असलेल्या जर्मनीमधील मॅक्स प्लँक संस्थेच्या एका सदस्य संशोधन संस्थेतील म्हणजेच मॅक्स प्लँक इन्स्टिटय़ूट फॉर अॅस्ट्रोनॉमी या संस्थेतील आकाशगंगा आणि विश्वउत्पत्तीशास्त्र विभागाकडून ( The Galaxies and Cosmology Department) खगोलशास्त्र , पदार्थविज्ञान किंवा तत्सम विषयांतील पदव्युत्तर पदवी ग्रहण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून खगोलशास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. दि. १ ऑक्टोबर २०१६ ते जून २०१७ च्या दरम्यान सुरू होणाऱ्या या पीएचडी अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती असून अर्जदारांना यासाठी दि. १२ सप्टेंबर २०१६ पूर्वी अर्ज सादर करायचा आहे. शिष्यवृत्तीविषयी:- जर्मनीमधील मॅक्स प्लँक संस्था जगातल्या मोजक्या नामांकित संस्थांपैकी एक असून मूलभूत संशोधनासाठी जगभर संस्थेचे नाव आदराने घेतले जाते. मॅक्स प्लँक संस्था फक्त जर्मनीतच नव्हे , तर संपूर्ण युरोपमध्ये कार्यरत असून संस्थेचे पहिले बिगरयुरोपीय केंद्र २००७ मध्ये फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठाच्या ज्युपिटर कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रत्येक आयामाला स्प...