संशोधनासाठी मिळवा शिष्यवृत्ती
ऑस्ट्रेलियामधील एक प्रमुख संशोधन केंद्र व महत्त्वाचे विद्यापीठ असलेल्या आरएमआयटी विद्यापीठाकडून वेगवेगळ्या विषयांमध्ये पीएचडी व पदव्युत्तर पदवी ग्रहण करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. दरवर्षीप्रमाणे २०१७ मध्ये सुरू होणाऱ्या प्रथम सत्रातील पीएचडी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून दि. ३१ ऑक्टोबर २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीविषयी :- ‘ रॉयल मेलबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ’ ( आरएमआयटी) हे तांत्रिक विद्यापीठ ऑस्ट्रेलियातील पहिल्या वीस नामांकित तर जगातल्या पहिल्या पाचशे विद्यापीठांपैकी एक आहे. १८८७ साली स्थापन झालेले हे विद्यापीठ व्हिक्टोरिया राज्याच्या राजधानीत म्हणजे मेलबर्न या शहरात क्षेत्रफळाने मोठय़ा भूभागावर वसलेले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये विद्यापीठाची एकूण चार केंद्र आहेत तर आशिया , युरोप आदी खंडातील देशांमध्ये एकूण तीन केंद्र आहेत. विद्यापीठाने तयार केलेल्या विविध अभ्यासक्रमांमध्ये व्यावसायिक , उपयोजित , किमान कौशल्यावर आधारित दृष्टिकोन जपलेला आहे. विद्यापीठाने जवळपास प्रत्येक विषयातील अभ्यासक्रमाचा आराखडा उद्योगक्षेत्रातील गरज ओ...