हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती
हॉंगकॉंगमधील हिनरीक फाउंडेशनकडून दरवर्षी भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित विषयांमध्ये पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पूर्णवेळ शिष्यवृत्ती देण्यात येते. यावर्षीसुद्धा ह्या फाउंडेशनकडू न आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या या विषयासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. इच्छुक भारतीय विद्यार्थ्यांकडून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पार्श्वभूमी :- मर्ल हिनरीक यांनी स्थापन केलेले हॉंगकॉंगमधील हिनरीक फाउंडेशन हे जागतिक व्यापाराला चालना देण्याचं काम त्यांच्या छोटयाशा पातळीवर करत आहे. हे काम करत असताना संस्थेनं आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित योजना, व्यापारासंबंधी शिक्षण-प्रशिक्षण व त्यातून रोजगार निर्माण इत्यादी विषयांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. एकूणच, या साऱ्यातून राष्ट्रा-राष्ट्रांमधील शांतता वाढीस लागो, असा उदात्त हेतू समोर ठेवून हिनरीक फाउंडेशन प्रामाणिकपणे काम करत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासारख्या व्यापक विषयाची आवड असणाऱ्या हुशार व ध्येयवादी भारतीय विद्यार्थ्यांनी या ...