जागतिक बँकेची 'आर्थिक ' पदव्युत्तर शिष्यवृत्ती
जागतिक बँकेकडून सदस्य असलेल्या विकसनशील राष्ट्रांमधील अर्जदारांना वेगळ्या विषयांवरील अभ्यासक्रम अथवा प्रकल्पांसाठी शिष्यवृत्त्या दिल्या जातात. जागतिक बँक जवळपास या सर्वच शिष्यवृत्त्या एखाद्या इतर सहकारी देशाच्या मदतीने देत असते. त्यातील एक महत्वाची शिष्यवृत्ती म्हणजे 'जपान-जागतिक बँक संयुक्त शिष्यवृत्ती' (Joint Japan/World Bank Graduate Scholarship - JJWBGS ). शिष्यवृत्तीच्या नावावरूनच समजते की ती जपानच्या सहकार्याने दिली जाते. जागतिक बँकेचेी ही शिष्यवृत्ती आर्थिक विकासाशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी देण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या शिष्यवृत्तीसाठी दि. ३१ मार्चपूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पार्श्वभूमी :- जागतिक बँकेच्या सदस्य देशांची संख्या साधारणत: १५० पेक्षाही जास्त आहे. जगातील सर्व विकसनशील देशांमध्ये आर्थिक स्थैर्य नांदावे म्हणून त्या देशांमधील आरोग्य, शिक्षण, कृषी, पर्यावरण विकासाशी संबंधित विषयांकडे जागतिक बँक विशेष लक्ष देत असते. विशेषत: यामुळेच अनेक विकसनशील देशांमध्ये जाग...