अमेरिकेत फुलब्राईट - नेहरू पाठ्यवृत्ती
युसिफ या संस्थेकडून भारतीय नागरिकत्व असलेल्या प्राध्यापक व संशोधकांना दरवर्षी अमेरिकेतील विविध विद्यापीठ व संशोधन संस्थांमध्ये अध्यापन आणि संशोधन करण्यासाठी पाठ्यवृत्ती बहाल केली जाते. ही पाठ्यवृत्ती म्हणजेच फुलब्राईट - नेहरू पाठ्यवृत्ती. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा ही पाठ्यवृत्ती हुशार व संशोधनाची प्रचंड आवड असणाऱ्या प्राध्यापक – संशोधकांना देण्यात येणार आहे. या पाठ्यवृत्तीसाठी युसिफकडून दि. १५ जुलै २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पार्श्वभूमी :- भारत व अमेरिकेमधील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रांतील सहकार्य वाढीस लागावे व अध्यापन - संशोधन क्षेत्रांतील विचारांची आदानप्रदान व्हावी या हेतूने युसिफ म्हणजेच द युनायटेड स्टेटस् – इंडिया एज्युकेशनल फाउंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. या संस्थेकडून दोन्ही देशांतील अभ्यासकांना विविध विषयांतील अध्यापन – संशोधनासाठी अनेक प्रकारच्या शिष्यवृत्त्या व इतर सहाय्यवृत्त्या देण्यात येतात. आतापर्यंत संस्थेकडून भारत व अमेरिकेतील मिळून एकूण १७००० पेक्षा अधिक ‘ फुलब्राईट फेलोज ’ निवडले गेलेले आहेत....