अमेरिकेत कृषी तंत्रज्ञानातील पाठ्यवृत्ती
हरितक्रांतीचे प्रणेते व जगद्विख्यात कृषिशास्त्रज्ञ नॉर्मन बोर्लोग यांच्या नावाने अमेरिकन सरकारच्या कृषी विभागाकडून आंतरराष्ट्रीय अर्जदारांना कृषी तंत्रज्ञानातील उच्चस्तरीय संशोधन करण्यासाठी दरवर्षी पाठ्यवृत्ती दिली जाते. २०१४ साठी देण्यात येणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २२ सप्टेंबर २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठ्यवृत्तीबद्दल:- नॉर्मन बोर्लोग कृषी तंत्रज्ञान पाठ्यवृत्ती कार्यक्रम हा हरितक्रांतीचे प्रणेते व जगद्विख्यात कृषिशास्त्रज्ञ नॉर्मन बोर्लोग यांच्या सन्मानार्थ २००४ सालापासून अमेरिकी कृषी विभागाने सुरु केला. या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत जवळपास ६४ देशांमधील कृषी अध्यापक, शास्त्रज्ञ व कृषी नियोजनकर्ते असलेल्या विविध पाठ्यवृत्तीधारकांना गौरवले गेले आहे. या पाठ्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत उपरोक्त व्यावसायिकांना अमेरिकेतील संशोधक किंवा शासकीय संस्थेबरोबर संयुक्त प्रशिक्षण व कृषी तंत्रज्ञानामध्ये उच्चस्तरीय संशोधन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पाठ्यवृत्तीचा एकूण कालावधी साधारणतः ६ ते १२ आठवड्यांचा आहे. काही कालावधीनंतर अमेरिकेतील संबंधित संशोधक किंवा शासकी...