पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'
उच्चशिक्षणासाठी परदेशात जाण्यामध्ये आता नाविन्यपूर्ण असे काही राहिलेले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेली शैक्षणिक आदानप्रदान ही पूर्वी होत असलेल्या व्यावसायिक देवाणघेवाणीएवढी सहज व सोपी झालेली आहे. प्रत्येक देशामधून कितीतरी विद्यार्थी त्यांच्या उच्चशिक्षणासाठी परदेशात जात असतात. विद्यार्थ्याच्या संबंधित शैक्षणिकविषयातील परदेशातील अनेक शासकीय व खाजगी संस्थांनी पाठबळ दिल्याने उच्च शिक्षणासाठीहजारो शिष्यवृत्त्या देखील उपलब्ध असतात. सर्वोत्तम जागतिक बुद्धिमत्तेला आपल्याकडेआकर्षित करण्याच्या हेतूने तरी निदान अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठे व संशोधनसंस्थां प्रचंड प्रमाणात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किंवा इतर प्रकारचे आर्थिक पाठबळउपलब्ध करत असताना दिसतात. विद्यार्थ्यांना शिष्यावृत्त्यांशी निगडीत सर्व प्रकारच्या बाबींचेनिकष माहित असणे खूप आवश्यक आहे. सदराच्या आजच्या या लेखात अनेक पदव्युत्तरअभ्यासक्रमांसाठी (मास्टर्स) उपलब्ध असलेल्या विविध देशांमधील शिष्यवृत्त्यांविषयी. अमेरिकेत ग्लोबल हेल्थ स्कॉलरशिप:- आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये अभ्यास वा काम करणाऱ्या विद्यार्थ्या...