आयपीसीसीची पीएचडीसाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती
२००७ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाल्याने चर्चेत आलेल्या आयपीसीसी (इंटर गव्हर्नमेंट पॅनेल फॉर क्लायमेट चेंज) या संस्थेने पारितोषिकाच्या निधीतून विकसनशील देशांतील संशोधक विद्यार्थ्यांसाठी आयपीसीसी शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला. आयपीसीसी शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत या देशांमधील युवा शास्त्रज्ञांना विद्यापीठामध्ये अथवा संशोधन संस्थेत ठराविक विषयांत दोन वर्षे संशोधन करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. २०१५-१७ मध्ये दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील युवा संशोधक अर्जदारांकडून दि. १५ फेब्रुवारी २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: डिसेंबर २००७मध्ये आयपीसीसीला मानवनिर्मित हवामान बदलांच्या परिणामांवर राबवलेल्या उपायांसाठी शांततेचे नोबेल पारितोषिक प्रदान केले गेले. यामुळे हवामान बदल आणि मानवी सुरक्षा यांचे महत्व अधोरेखित झाले. म्हणूनच पारितोषिकाच्या मिळालेल्या निधीमधून आयपीसीसीने या विषयांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात हा शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवण्यासाठी आणखी आर्थिक भागीदारीची गरज होती...