अमेरिकेत कला शाखेतील शिष्यवृत्ती
जागतिक स्तरावर कलाशाखा व सामाजिक शास्त्रांमधील गुणात्मक व अद्ययावत संशोधन करणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणजे अमेरिकेमधील गेटी संशोधन संस्था. कलाशाखा व समाजशास्त्रांचे संशोधन करणे आणि लेखन- संशोधनाच्या माध्यमातून विविध सामाजिक घटकांपर्यंत पोहोचणे व त्यातून या विद्याशाखांचे संवर्धन करणे या हेतूने प्रेरित असलेली ही संस्था लॉस एंजेलिसस्थित ‘द गेटी फाउंडेशन’कडून चालवली जाते. या विविध विद्याशाखांमधील गुणवंत व्यक्तींना त्यांच्या संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर मुक्तपणे व कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक औपचारिकतेशिवाय मांडता याव्यात यासाठी दरवर्षी ठराविक आंतरराष्ट्रीय अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संबंधित विषयांतील अर्जदारांकडून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. गेटी फाउंडेशनच्या या शिष्यवृत्तीला अर्ज सदर करण्याची अंतिम मुदत दि. १ ऑक्टोबर २०१५ आहे. शिष्यवृत्तीबद्दल:- अमेरिकेत लॉस एंजेलिसमधील ‘द गेटी फाउंडेशन’ या संस्थेने कला क्षेत्र व सामाजिक शास्त्रांशी संबंधित इतर शाखांमधील उत्कृष्ट दर्जाच्या संशोधनासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. या पुढाकाराचाच एक भाग ...