बिझनेस स्कूलमध्ये पीएचडीची संधी
लीड्स विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलकडून आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयाशी संबंधित विषयांवर संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो . पीएचडीसाठी प्रवेश व एकूण तीन वर्षाच्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे . या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर अर्जदार अर्ज करू शकतो . पात्र अर्जदारांकडून या शिष्यवृत्तीसाठी दि . १ जून २०१७ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत . शिष्यवृत्तीबद्दल : इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशायरमधील लीड्स शहरात वसलेले लीड्स विद्यापीठ हे युरोपमधील एक प्रमुख विद्यापीठ आहे . या विद्यापीठाचा बिझनेस स्कूल हा विभागही युरोप व जगातल्या प्रमुख बिझनेस स्कुल्स् पैकी एक आहे . लीड्स बिझनेस स्कूलकडून पदवी , पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम बहाल केले जातात . या विभागाचा एमबीएचा अभ्यासक्रम हा जगातल्या नामांकित १०० अभ्यासक्रमांपैकी एक आहे . १९९७ साली स्थापना झालेल्या या विभागामध्ये सर्व अभ्यासक्रमांचे मिळून जवळपास तीन हजा...