मेरी डिग्री है जापानी!
जपानमधील केओ विद्यापी ठाकडून ‘ग्लोबल इन्फॉर्मेशन अँड गव्हर्नंन्स अॅकॅडमिक’ (GIGA) या कार्यक्रमांतर्गत प्रशासन कौशल्य,पर्यावरण अभ्यास आणि माहिती-तंत्रज्ञान या तिन्हींचा एकत्रित समावेश असलेल्या पदवी अभ्यासक्रमासाठी म्हणजेच ‘बॅचलर ऑफ आर्ट्स इन एन्व्हायर्नमेंट अँड इन्फॉर्मेशन स्टडीज’ या पदवीचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्याला प्रवेश व प्रवेश शुल्कासहित इतर सर्व सोयीसुविधा असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण असलेल्या अर्जदारांकडून या विद्यापी ठा ने दि. १३ फेब्रुवारी २०१ ७ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल : - केओ विद्यापीठ हे जपानमधील सर्वात जुने विदयापीठ आहे. टोकियोतील मिनॅटो या उपनगरात वसलेल्या या विद्यापीठाची स्थापना १८५८ साली झालेली असून विद्यापीठात साहित्य , अर्थशास्त्र , कायदा , व्यवसाय आणि वाणिज्य , वैद्यकशास्त्र , विज्ञान आणि तंत्रज्ञान , धोरण व्यवस्थापन , पर्यावरण आणि माहिती अभ्यास , नर्सिंग व फार्मसी या सर्व विद्याशाखांतील पदवी ते पीएचड...