जपानमध्ये स्पेस सायन्समधील पाठ्यवृत्ती
अंतराळविज्ञानातील (Space Science) जागतिक स्तरावरील जपानस्थित दोन प्रख्यात संशोधन संस्था ‘इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अॅण्ड अॅस्ट्रॉनॉटीकल सायन्सेस’ (ISAS) आणि ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ (JAXA) यांच्याकडून संयुक्तपणे जपानमध्ये अंतराळविज्ञानातील विविध विद्याशाखांमध्ये उच्चस्तरीय संशोधन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यवृत्ती दिली जाते. स्पेस सायन्समध्ये जगभरात अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी ही पाठ्यवृत्ती ‘इंटरनॅशनल टॉप यंग फेलोशिप’(ITYF) या नावाने ओळखली जाते. दोन्ही संस्थांनी २०१३ साठी देण्यात येणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३१ ऑगस्ट २०१३ पूर्वी अर्ज मागवले आहेत. पाठ्यवृत्तीबद्दल:- २००९सालापासून ISAS आणि JAXA यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दिली जाणारी ‘इंटरनॅशनल टॉप यंग फेलोशिप’ (ITYF)ही पाठ्यवृत्ती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिमत्तेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जपानने उचललेले हे एक मोठे पाऊल आहे असे म्हणावे लागेल. विख्यात अशा दोन संशोधन संस्थांचे पाठबळ जरी ITYF ला असले तरी मुख्यत्वे ही पाठ्यवृत्ती ‘जपान एरोस्पेस ...