स्वित्झर्लंडमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती
ग्लोबल अलायन्स ( Global Alliance for Public Relations and Communication Management ) ही स्वित्झर्लंडमधील जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या क्षेत्रात काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. स्वित्झर्लंडमधील युएसआय (University of Italian Switzerland ) या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर ग्लोबल अलायन्सच्या सहकार्याने जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवला जातो. या क्षेत्रातील आपल्या करिअरच्या मधल्या टप्प्यात असणाऱ्या अनुभवी व्यावसायिकांना हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता यावा यासाठी ग्लोबल अलायन्सच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६-१७ साठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून दि. ३१ जानेवारी २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम मानांकन असलेले आणि जनसंपर्क व संवाद व्यवस्थापनामधील जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणारा प्राध्यापकवर्ग यासाठी ओळखले जाणारे युएसआय (University of Italian Switzerland ) हे आंतररा...