सिंगापूरमध्ये एमबीएची संधी
व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांमधील आशिया खंडातील जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवणारी महत्त्वाची संस्था म्हणून सिंगापूरमधील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या नानयांग बिझनेस स्कूलला ओळखले जाते. एका नामांकित वृत्तपत्राच्या जागतिक क्रमवारीतील व्यवस्थापन अभ्यासक्रमांमध्ये पहिल्या तीस विद्यापीठांमध्ये , आशियातील तिसरे तर सिंगापूरमधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून नानयांग बिझनेस स्कूलने स्थान पटकावले आहे. बिझनेस स्कूलकडून दरवर्षी गुणवंत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एमबीएसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे २०१७ या शैक्षणिक वर्षांसाठीही आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमासहित शिष्यवृत्तीसाठी मार्चच्या अंतिम आठवडय़ापर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीविषयी:- सिंगापूरमधील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठ हे त्या देशातील एक प्रमुख विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा बिझनेस स्कूल हा विभागही आशिया व जगातल्या प्रमुख बिझनेस स्कूल्सपैकी एक आहे. नानयांग बिझनेस स्कूलकडून पदवी , पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम बहाल केले जातात. या तिन्ही पदवी स्तरांवरील विविध अभ्यासक्रमा...