Posts

ऑक्सफर्डमध्ये एमबीएसाठी शिष्यवृत्ती

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या उद्योग-व्यवस्थापन विभागात उपलब्ध असलेल्या एमबीए (१+१) अभ्यासक्रमासाठी पìशग स्क्वेअर फाऊंडेशनकडून हुशार आणि नेतृत्वगुण असलेल्या विदेशी अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६-१७ साठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून १८ मार्च २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीविषयी.. जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठ अशी ओळख असलेल्या तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम मानांकन प्राप्त झालेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची ख्याती सर्वश्रुत आहेच. अद्ययावत उद्योग- व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे, जागतिक दर्जाचे प्रशिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात उपलब्ध आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम व वेगवेगळे विभाग आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. या विद्यापीठाचा व्यवसाय विभाग सद बिझनेस स्कूल या नावाने ओळखला जातो. सौदी उद्योजक सद वाफिक यांच्या निधीतून हा विभाग १९९६ साली विद्यापीठात सुरू करण्यात आला. या विभागाच्या वतीने पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रम राबवण्यात येतात. या विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या एकूण अभ्यासक्रमांमध्ये पदव्युत्तर अभ्...

कॅनडामध्ये पदार्थविज्ञानात पदव्युत्तर शिष्यवृत्ती

सैद्धांतिक पदार्थविज्ञानात जागतिक दर्जाच्या मोजक्या स्वतंत्र संशोधन संस्थांपैकी एक म्हणजे कॅनडातील ‘पेरिमीटर इन्स्टिट्यूट फॉर थिओरोटिकल फिजिक्स’. कॅनडातीलच वाटर्लु विद्यापीठाच्या सहकार्याने संस्थेकडून सैद्धांतिक पदार्थविज्ञानातील पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवला जातो. या विषयात संशोधन व उच्चशिक्षण करू इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी दोन्ही संस्थांकडून एकत्रितपणे शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे २०१६ साली दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी पदार्थविज्ञान किंवा गणित विषयातील आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून दि. १ फेब्रुवारी २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल : ‘पेरिमीटर इन्स्टिट्यूट फॉर थिओरोटिकल फिजिक्स’ ही कॅनडातील वाटर्लु शहरात असलेली संशोधन संस्था आहे. पदार्थविज्ञानामध्ये गुणात्मक संशोधन करणाऱ्या जगातल्या ज्या काही मोजक्या स्वतंत्र संशोधन संस्था आहेत, त्यापैकी ही एक.  स्वत: अर्ध्यातच महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिलेल्या, ब्लॅकबेरीचे संस्थापक उद्योजक माईक लझारीदीस यांनी १९९९ साली या संस्थेची स्थापना केली. सैद्धांतिक पदार्थविज्ञानात मुळातच जागतिक दर्जाचे...

स्वित्झर्लंडमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती

ग्लोबल अलायन्स ( Global Alliance for Public Relations and Communication  Management ) ही स्वित्झर्लंडमधील जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या क्षेत्रात  काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. स्वित्झर्लंडमधील युएसआय (University of Italian Switzerland ) या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर ग्लोबल अलायन्सच्या सहकार्याने जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवला जातो. या क्षेत्रातील आपल्या करिअरच्या मधल्या टप्प्यात असणाऱ्या अनुभवी व्यावसायिकांना हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता यावा यासाठी ग्लोबल अलायन्सच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६-१७ साठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून दि. ३१ जानेवारी २०१६ पूर्वी अर्ज  मागवण्यात आले आहेत.  शिष्यवृत्तीबद्दल: आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम मानांकन असलेले आणि जनसंपर्क व संवाद व्यवस्थापनामधील जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणारा प्राध्यापकवर्ग यासाठी ओळखले जाणारे युएसआय (University of Italian Switzerland ) हे आंतररा...

फ्रान्समध्ये आयफेल शिष्यवृत्ती

फ्रान्समधील अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि मुलभूत विज्ञान व अर्थशास्त्रातील पीएचडीच्या अभ्यासक्रमासाठी विविध विद्यापीठ किंवा संशोधन संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या खर्च सुसह्य व्हावा यासाठी फ्रान्स सरकारच्या परराष्ट्र आणि युरोपीय व्यवहार मंत्रालयाकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आयफेल शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामधील या अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून दि. ८ जानेवारी २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि मुलभूत विज्ञान व अर्थशास्त्रातील पीएचडीच्या अभ्यासक्रमासाठी फ्रान्समधील विविध विद्यापीठ किंवा संशोधन संस्थांमध्ये प्रवेश मिळालेला असताना त्यांच्या निवास,भोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक सुरक्षा याबाबतीतील खर्चाचा ताण त्यांच्यावर पडू नये आणि तेथील विविध विद्यापीठांमध्ये त्यांचे शिक्षण सहजरीत्या व्हावे यासाठी फ्रान्स सरकारच्या परर...

आशिया फाऊंडेशनची पाठय़वृत्ती

अाशिया खंडातील देशांमध्ये असलेल्या विविध समस्यांवर काम करणाऱ्या युवावर्गाला या समस्यांविषयक सखोल ज्ञान प्राप्त व्हावे आणि त्यांच्यातील नेतृत्व कौशल्ये विकसित व्हावीत या हेतूने ‘आशिया फाऊंडेशन विकास पाठय़वृत्ती’ ही पाठय़वृत्ती दिली जाते. एकविसाव्या शतकात भारतासह इतर आशियाई देशांना भेडसावणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर काम करणाऱ्या उमेदवारांकडून तसेच इतर क्षेत्रांतील अर्जदारांकडून या पाठय़वृत्तीसाठी १ डिसेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठय़वृत्तीबद्दल: कृतिशील व विकसनशील आशिया खंडाचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या संस्थांपकी आशिया फाऊंडेशन ही एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे. १९५४ साली स्थापना झालेल्या या संस्थेने विविध शासकीय-स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने नेतृत्व आणि संस्थात्मक विकास आणि धोरण संशोधन या क्षेत्रांमध्ये भरीव काम केले आहे. ही संस्था गेली सहा दशके आशिया खंडातील देशांना भेडसावणाऱ्या कायदा-प्रशासन, आíथक विकास, महिला सबलीकरण, पर्यावरण आणि प्रादेशिक सहकार्य या गंभीर मुद्दय़ांवर कार्यरत आहे. आशिया फाऊंडेशनचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्...

फ्रान्समध्ये अंतराळ संशोधनातील पदव्युत्तर शिष्यवृत्ती

जगभरातील ज्या निवडक  संस्था भावी अंतराळवीर घडवण्याचे कार्य  करतात त्यांपकी एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (International Space University). या विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६ मधील विविध अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून ३० नोव्हेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- अंतराळ क्षेत्रातील विकासाच्या साहाय्याने संपूर्ण जगाचे हित साधावे आणि त्यातून मानवजातीचे भविष्य समृद्ध व्हावे या हेतूने आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (International Space University) या संस्थेची स्थापना १९८७ साली पीटर डायमंड्स, टॉड हॉले व रॉबर्ट रिचर्ड्स या तीन अंतराळवीरांनी एकत्र येऊन केली.  फ्रान्समधील अल्सेस प्रांताची राजधानी असलेल्या स्ट्रॉसबर्ग शहरात स्थित असे हे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय, आंतरसांस्कृतिक व आंतरविद्याशाखीय अशा तीन तत्त्वांवर चालते. या विद्यापीठामध्ये अंतराळ अभ्यासक्रम...

पर्यावरणातील पीएचडीसाठी नॉर्वेमध्ये पाठय़वृत्ती

नॉर्वेमधील प्रसिद्ध ऑस्लो विद्यापीठाच्या  जैवशास्त्र विभागातर्फे ‘पर्यावरण’ या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्यासाठी पाठय़वृत्ती दिली जाते. पाठय़वृत्तीचा कालावधी तीन वर्षांचा आहे. २०१६ वर्षांकरता दिल्या जाणाऱ्या या पाठय़वृत्तीसाठी विद्यापीठाकडून ८ ऑक्टोबर २०१५ पूर्वी अर्ज मागविण्यात आले आहेत. पाठय़वृत्तीविषयी:-   ऑस्लो विद्यापीठ (द युनिव्हर्सटिी ऑफ ऑस्लो) हे जागतिक स्तरावर नावलौकिक असलेले नॉर्वेतील प्रख्यात व सर्वात मोठे विद्यापीठ आहे. शिक्षण व संशोधन क्षेत्रातील जगातल्या मोजक्या उत्कृष्ट केंद्रांपकी एक असलेले हे विद्यापीठ, विविध विद्याशाखांची उपलब्धता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा संशोधन समुदाय याकरता जगभरातील विद्यार्थ्यांचा आणि संशोधकांचा आकर्षणबिंदू राहिले आहे. सुमारे २८ हजार विद्यार्थी व सात हजार कर्मचारी विद्यापीठाची व्यापकता संख्यात्मक पद्धतीनेही अधोरेखित करतात. विद्यापीठाच्या बायोसायन्सेस विभागापकी सेंटर ऑफ इकॉलॉजिकल अ‍ॅण्ड इव्हॉल्यूशनरी सिंथेसिस (CEES) या केंद्रामध्ये इकॉलॉजी या विषयातील रीसर्च फेल...