अमेरिकेतील पदवीधरांसाठी रेडक्रॉस अधिछात्रवृत्ती
अमेरिकेतील रेड क्रॉस या संस्थेतर्फे अमेरिकी विद्यापीठांतून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसहित सध्या अमेरिकेत पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रात वेतनासह व विनावेतन उन्हाळी अधिछात्रवृत्ती (summer internship) दिली जाते. २०१५ साली घेतल्या जाणाऱ्या या उन्हाळी अधिछात्रवृत्ती कार्यक्रमासाठी (दि. ८ जून २०१५ ते १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत ) ‘अमेरिकन रेड क्रॉस’कडून दि.२७ फेब्रुवारी २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिछात्रवृत्तीबद्दल: भविष्यातील ‘रेड क्रॉस’च्या ध्येयधोरणांना लक्षात घेऊन विविध क्षेत्रांमधील बहुविध पार्श्वभूमी असलेले युवा नेतृत्व जागतिक पातळीवर तयार व्हावे, व वेगवेगळ्या देशांमधील तरुणाईला अल्पवयातच ही संधी सहज उपलब्ध व्हावी या हेतूने अमेरिकन रेड क्रॉस या संस्थेच्या वतीने ही अधिछात्रवृत्ती सुरु करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर रेड क्रॉसचे कार्य वैद्यक क्षेत्राबरोबरच इतर कार्यक्षेत्रांत देखील सुरु आहे. त्यामुळे इतर विविध क्षेत्रांमधील कुशल मनुष्यबळाची वानवा भविष्यात भासू नये हे संस्थेने लक्षात घेतले ...